Balasaheb Thorat, Ajit Pawar
Balasaheb Thorat, Ajit PawarSarkarnama

Balasaheb Thorat News : आधी धाडस दाखवलं नाही, आता पोरासोरांना दम देतात; थोरातांचा अजितदादांना खोचक टोला

Ajit Pawar Vs Nilesh Lanke : अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहे. अजित पवारांना ते धाडसी आहेत हे दाखवण्याच्या खूप संधी होत्या. मात्र त्यांनी त्या गमावल्या.

Ahmednagar Political News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना आघाडीच्या नेत्यांसह उमेदवारांना दमाची भाषा सुरू केली आहे. अजितदादांनी शिरूरचे आमदार अशोक पवार, दक्षिण नगरचे आघाडीचे उमेदवार नीलेश लंके आणि बीडचे बजरंग सोनवणे यांच्यावर आव्हान दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी अजित पवारांनी शेलक्या भाषेत टोले लगावले आहेत.

संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरातांनी अजित पवारांना Ajit Pawar सुनावले आहे. ते म्हणाले अजित पवारांना ते धाडसी आहेत हे दाखवण्याच्या खूप संधी होत्या. मात्र त्यांनी त्या गमावल्या. अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहे. मात्र त्यांनी पोरासोरांना दमबाजी करणे सुरू केले आहे. नीलेश लंकेंना दमबाजी करून काहीही होणार नाही. आता नीलेश लंके यांना विजयी करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे, असेही थोरात म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. यात आघाडीला चांगले यश मिळणार असून चौथ्या टप्प्यातही आघाडी चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वासही थोरातांनी Balasaheb Thorat यावेळी व्यक्त केला. लोकसभेत महाविकास आघाडीला खूपच चांगलं यश मिळेल याची खात्री आहे. चौथ्या टप्यातही यश चांगलंच राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी बरोबर आहे. नगरमधील दोन्ही जागा आमच्याच आहेत. त्यामुळं आमचं यश निश्चित आहे, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb Thorat, Ajit Pawar
Akot Police Crime : अकोट पोलिस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई; ठाणेदार कोल्हे यांची अखेर उचलबांगडी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना Sharad Pawar एनडीएची ऑफर दिली आहे. यावर थोरात म्हणाले, मोदी पंतप्रधान आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांनी केलेली कामे आणि पुढची कामे सांगायला हवी होती. मात्र मोदी फक्त शब्दच्छल आणि दिशाभूल करताना दिसले. पवारांवर केलेले आरोप खालच्या पातळीवर होते. आता त्यांना शेवटच्या टप्प्यात बहुमत मिळताना दिसत नाही. यातूनच ते सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. या विधानातून मोदींचा आत्मविश्वास कमी झाल्याचा टोलाही थोरातांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Thorat, Ajit Pawar
Dhule Loksabha constituency : धक्कादायक ! प्रियंका गांधींच्या स्वागताकडे धुळ्याच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची पाठ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com