

Sushma Andhare News : साताराऱ्यातील फलटण येथे महिला डाॅक्टरने हाॅटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांना दोघांना अटक देखील केली होती. अटक केलेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा समावेश होता. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारने तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली होती.
या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी या प्रकरणी एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशीचा आग्रह धरला होता. गोपाळ बदने याला निलंबित करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी फलटणमध्ये आंदोलन देखील केले होते. अखेर सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे.
एसआयटीमध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, फलटणचे उपविभाग पोलिस अधिकारी विशाल तांबे, राहुल लाड (सपोनि), सखाराम बिराजदार (सपोनि), विशाल वायकर (सपोनि), अभिजीत गुरव (पोउपनि), अभिजित सावंत (पोउपनि) यांचा समावेश आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत सांगितले की, फलटण आंदोलनानंतर तीन मागण्यांना यश आले आहे. गोपाल बदनेची तात्काळ बडतर्फी, हत्या की आत्महत्या या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी, महिला डाॅक्टर बद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर सर्व प्रकारच्या पब्लिक डोमेन मधून काढून टाकण्यासाठी गुगल आणि युट्युबला गृह खात्याकडून पत्र.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, एसआयटी नको उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी अशी मी वारंवार मागणी मी करत आहे. कारण एसआयटीतील नेमलेले पोलीस अधिकारी आणि त्यांचे कार्यक्षेत्र बघितल्यावर आपल्या लक्षात येईल.
एसआयटीतील सात पैकी पाच अधिकारी हे फलटण आणि सातारा कार्यक्षेत्रातील आहेत. तर उर्वरित दोन पैकी वायकर नावाचे अधिकारी आणि गोपाल बदने हे एकत्रित कार्यरत होते.
अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, फलटण पोलिस स्टेशन हे स्थानिक राजकीय दबावामुळे छळ छावणी झाले आहे, हे मी वारंवार मांडत आहे. आणि त्याच फलटण तथा सातारा जिल्ह्यातील जर सात पैकी पाच अधिकारी एसआयटीत असतील तर हे लोक पीआय सुनील महाडिक, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील आणि दोन पीए शिंदे आणि नागटिळक यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्या इतपत भयमुक्त काम करू शकतील का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.