-विशाल गुंजवटे
Maan Political News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व दिवंगत आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर पाऊल टाकत अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केली आहे. या माध्यमातून राज्यभर हिंदूत्वाचा जागर करण्यासाठी शिवसेनेतर्फे भक्ती-शक्ती संवाद यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षयमहाराज भोसले यांनी दिली आहे.
शिवसेनेचे Shivsena खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण अशा पाच टप्प्यात 36 जिल्ह्यात संवाद यात्रा जाणार आहे. या यात्रा कालावधीत महाराष्ट्रातील भक्ती पंथ ,तीर्थक्षेत्र व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, भजन मंडळ या सोबत घेऊन निघणार आहे.
हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिव शंभो विचारांना समाजापर्यंत नेणाऱ्या युवक, गोरक्षक व ज्येष्ट लोकांशी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले व त्यांच्यासमवेत असलेले विविध पंथाचे प्रचारक,संताचे वंशज संवाद साधत हिंदूत्वाचा जागर करणार आहेत. प्रत्येक दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे.
अध्यात्मिक क्षेत्रासाठी असा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात होत असल्याने अध्यात्मिक क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात याचे स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व साधू संतांविषयी असणारा उत्कट जिव्हाळा व श्रद्धा या माध्यमातून दिसून येते. संतांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच संतांजवळ गेले पाहिजे हा संदेश यातून साहेबांनी समाजाला दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजसत्ता व धर्मसत्ता जेव्हा सोबत प्रवास करते तेव्हा निश्चित रामराज्य निर्माण होते. शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील रामराज्य महाराष्ट्र पाहत असल्याचेही अक्षयमहाराज भोसले यांनी सांगितले. या संवाद यात्रेसाठी शिवसेना सचिव संजय मोरे व माध्यम समन्व्यक दिनेश शिंदे यांचेही विशेष सहकार्य लाभले असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
Edited By : Umesh Bambare-Patil
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.