(Video) Praniti Shinde Pandharpur Tour : पहिल्याच कृतज्ञता मेळाव्यात भालके समर्थकांचा प्रणिती शिंदेंसमोर गोंधळ

Bhalke Supporter : कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर आमदार (स्व.) भारत भालके आणि त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचे फोटो नसल्याने भालके समर्थकांनी खासदार शिंदेंच्या समोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
Praniti Shinde-Bhagirath Bhalke
Praniti Shinde-Bhagirath BhalkeSarkarnama

Solapur, 13 June : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आज कृतज्ञता मेळाव्यानिमित्त पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर आमदार (स्व.) भारत भालके आणि त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचे फोटो नसल्याने भालके समर्थकांनी खासदार शिंदेंच्या समोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. प्रणिती शिंदे यांनी चूक मान्य करत बॅनर काढण्याची सूचना केल्यानंतर भालकेंचे कार्यकर्ते शांत झाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) ह्या सुमारे ७४ हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयात पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिंदेंना १ लाख २४ हजार ७११ मते, तर सातपुते यांना ७९ हजार २९१ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना तब्बल ४५ हजार ४२० मतांचे लीड मिळाले आहे.

पंढरपूरमधून मिळालेल्या मताधिक्क्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंती सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याच्या निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर उभे करण्यात आले आहेत. या बॅनरवर कुठेही भारत भालके आणि त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे फोटो नव्हते.

Praniti Shinde-Bhagirath Bhalke
(Video) Abdul Sattar Vs Raosaheb Danve : अब्दुल सत्तार कधी कोणाशी एकनिष्ठ राहिलेत, ते माझ्याशी राहतील; दानवेंनी निशाणा साधला

पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भालके यांचेच छायाचित्र बॅनरवर नसल्यामुळे समर्थकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना जाब विचारत गोंधळ घालायला सुरुवात केली. समर्थकांनी एकच वादा...भगीरथदादा म्हणत घोषणाबाजी केली. भालके समर्थकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन खुद्द प्रणिती शिंदे बाहेर आल्या. त्यांनी भगीरथ भालके आणि समर्थकांशी चर्चा केली.

कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर भारत भालके आणि भगीरथ भालके यांचे फोटो नसतील तर तो बॅनर काढून टाकण्यात येईल. जोपर्यंत हे बॅनर काढले जाणार नाही, तोपर्यंत मीही सभागृहामध्ये जाणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर भालके समर्थकांचे समाधान झाले. त्यानंतर प्रणिती शिंदे, भगीरथ भालके आणि भालके समर्थक कार्यक्रमस्थळी गेले.

Edited by : Vijay Dudhale

Praniti Shinde-Bhagirath Bhalke
(Video) Manoj jarange News : अंबादास दानवे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत एकाचवेळी जरांगेंच्या भेटीला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com