Bidri Factory Election : ‘केपीं’ना ए. वाय. खिंडीत गाठणार; विरोधकांचे नेतृत्व करण्याच्या तयारीत

Kolhapur Politics : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत विधानसभेची लिट्‌मस टेस्ट पाहायला मिळणार
k. P. Patil-A. Y. Patil
k. P. Patil-A. Y. PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीवरून आजी-माजी आमदार आमने-सामने आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाची चावी हातात ठेवण्यासाठी बिद्री साखर कारखाना ताब्यात असणे महत्त्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. येत्या महिनाभरात बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने विधानसभेची लिट्‌मस टेस्ट पाहायला मिळणार आहे. (Bidri sugar factory election K. P. Patil alone?)

बिद्री सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (ता. १६ ऑक्टोबर) जाहीर झाला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघाची लिट्‌मस टेस्ट म्हणून बिद्री कारखान्याच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. कारखाना ताब्यात राहावा, यासाठी आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

k. P. Patil-A. Y. Patil
Solapur News : 'फडणवीस आता तुमची वेळ...'; चंद्रकांतदादांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीचा इशारा

शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी बिद्री कारखान्यात सत्तांतर घडविण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी हाती दारूगोळा असावा म्हणून त्यांनी बिद्री कारखान्याच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. पण, राष्ट्रवादी सत्तेत गेल्यानंतर सत्ताधारी माजी आमदार के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात उशिरा दाखल होत लेखापरीक्षण होऊ नये, यासाठी धडपड केली. सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे.

विरोधकांचा अपहाराचा आरोप

विरोधी गटाकडून सत्ताधारी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पावणे दहा कोटी रुपयांचा अपहार करून सभासदांची फसवणूक केल्याची तक्रार राधानगरी येथील विजय रघुनाथ बलगुडे यांनीड मुरगूड पोलिस ठाण्यात आणि प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्याकडे दिली आहे.

साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्प व आधुनिकीकरणासाठी घेतलेले कर्ज २०२० ते २०२३ या काळात नीरंक झाले आहे. या कर्जाच्या व्याजापोटी सुमारे नऊ कोटी ८१ लाख ८१ हजार ९४० रुपये खर्च दाखवला आहे. संगनमताने हा अपहार केला असून, बनावट नफा-तोटा पत्रक तयार केले आहे आणि बोगस तोटा दाखवला आहे, असा आरोप बलगुडे यांनी केला आहे. कारखान्याची चौकशी करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी बलगुडे यांनी केली.

k. P. Patil-A. Y. Patil
Ajit Pawar : शरद पवारांनंतर अजितदादांनी 'तो' कित्ता गिरवला; आमदार लंके पुन्हा लोकसभेच्या चर्चेत!

'केपीं'चा खुलासा

विरोधकांचे आरोप खोडून काढताना आम्ही कारखान्यात एक नया पैशाचा अपहार केलेला नाही. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. अकाउंटमधल्या त्यांना न समजलेल्या काही गोष्टींमुळे केवळ राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याच्या उद्देशाने चिखलफेक करण्यात येत आहे. आता प्रचाराचा दुसरा कोणताही मुद्दाच नसल्याने खोटे आरोप करण्याचे काम विरोधी मंडळी करत आहे, असे बिद्री कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र

बिद्रीच्या आतापर्यंतच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठिंबा देऊन बिद्रीत सत्ता स्थापन केली. माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांचे पाहुणे ए. वाय. पाटील यांची मदत घेतली. शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर बिद्रीच्या राजकारणात एकाकी लढत आहेत, पण गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकीय घडामोडींचा कोल्हापूरच्या राजकारणावर परिणाम झाला आहे.

k. P. Patil-A. Y. Patil
बोरवणकरांचे आरोप ; रोहित पवारांची थेट चौकशीची मागणी | Rohit Pawar On Ajit Pawar |

कोणत्या गटाला मिळणार साखरेचा गोडवा

भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याने राष्ट्रवादी एकाकी पडली होती. दोन मेहुण्यांमधील वाद उफाळून आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ए. वाय. पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. के. पी. पाटील आणि त्यांच्यातील वाद वारंवार समोर येत आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत गेल्यानंतर ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच बिद्रीचे लेखापरीक्षण वाचविण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांनी शब्द घेऊन काही महिन्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या बिद्रीत के. पी. पाटील एकाकी पडले आहेत. ए. वाय. पाटील हे पाहुण्यांना शह देऊन विरोधकांच्या गटाचे नेतृत्व घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे, त्यामुळे बिद्रीच्या राजकारणात कोणत्या गटाला साखरेचा गोडवा चाखता येणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

k. P. Patil-A. Y. Patil
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार; या ठिकाणी होणार जाहीर सभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com