Bidri Sugar Factory: जिल्हाध्यक्षांचं स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाच तगडं आव्हान; मंत्री मुश्रीफ-पाटलांची प्रतिष्ठा पणाला

Hasan Mushrif and Chandrakant Patil : स्वत:च्याच पक्षातील जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी मंत्री मैदानात
Hasan Mushrif and Chandrakant Patil
Hasan Mushrif and Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी त्यांच्याच पक्षाचे मंत्री मैदानात उतरलेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी विरोधी भूमिका घेत दोन मंत्र्यांना आव्हान दिले आहे.

जिल्ह्यात सध्या ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने साडेतीन तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारूढ माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरुद्ध त्यांचे पारंपरिक विरोधक आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापुरताच मर्यादित राहिलेला हा वाद आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि भाजपमधील फुटीरांपर्यंत येऊन पोहाेचला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif and Chandrakant Patil
Solapur News : दोन माजी सहकारमंत्र्यांसह सोलापुरातील मातब्बर नेत्यांच्या सात कारखान्यांना नोटीस...

‘बिद्री’च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील हे सत्तारूढ गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई उमेदवार आहेत.

या आघाडीच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आहे.

या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उमेदवार आहेत. त्यातून मुश्रीफ हे ए. वाय. यांच्या, तर मंत्री पाटील हे देसाई यांच्याच पराभवासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ आघाडीचे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांना साथ दिली होती. त्यावेळी विठ्ठलराव खोराटे यांच्यासह तीन संचालक होते. आता तेच मंत्री पाटील सत्तारूढ गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ए. वाय. सत्तारूढ गटासोबत होते. त्यांनी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्याकडूनही सत्तारूढ गटावर आरोप होत आहेत. हा विरोधाभास चर्चेचा विषय ठरला आहे.

राजकीय समीकरणे बदलली

‘भोगावती’च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व त्यांचे कट्टर विरोधक शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे एकत्र आले. त्याचप्रमाणे ‘बिद्री’तही सत्तारूढ गटाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी विरोधी आघाडीला साथ दिली आहे.

गेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हेही विरोधकांसोबत आहेत. परिणामी या दोन्ही निवडणुकांमुळे त्या-त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही उमटणार आहेत.

(Edited By - Ganesh Thombare)

Hasan Mushrif and Chandrakant Patil
Eknath Khadse On BJP:...तेव्हा भाजपने सनातन धर्म खुंटीवर टांगला होता का ?; एकनाथ खडसेंचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com