

Satara, 17 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक जिल्हा परिषद सदस्या भाजपच्या गळाला लागली आहे, त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळावा घेऊन संबंधित जिल्हा परिषद सदस्याला अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे साताऱ्यात शह-कटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे.
खटाव तालुक्याच्या बुध जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या लता कर्णे या भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात होती. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी त्याबाबत मेळावा घेऊन कर्णे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आला आहात, पक्षासोबत आणि बुध गटातील जनतेसोबतची बांधिलकी कायम ठेवा. स्वतःहून राष्ट्रवादीसोबत परत या; अन्यथा अपात्रेतची कारवाई करण्यात येईल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, लता कर्णे यांना निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या (BJP) एका मंत्र्याकडून रसद पुरविण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीतील त्या उपकराची परतफेड करण्यासाठी कर्णे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. कर्णे यांच्या या पावलामुळे राष्ट्रवादीचे नेते तोंडघशी पडले आहेत.
फलटणमध्ये सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्य फुटले आहेत. त्यात कर्णे यांची घडामोड पुढे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करण्यास भाजपच्या नेत्यांकडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
भाजपचे फोडाफोडीचे लोण आता अगदी स्थानिक पातळीपर्यंत पोचले आहे. लता कर्णे यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून निवडून आणले आहे. त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीसोबत यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा शिंदेंनी दिला आहे.
लता कर्णे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहावे; अन्यथा त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का कायमचा लागणार आहे. तुम्हाला राष्ट्रवादीसोबत राहायचे नसेल तर जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा द्या आणि भाजपमध्ये जावे, असा सल्लाही माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी कर्णे यांना दिला.
‘शशिकांत शिंदे सांगतील; त्यालाच कर्णे मतदान करतील’
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या लता कर्णे ह्या आमदार शशिकांत शिंदे सांगतील, त्यालाच मतदान करतील, असा शब्द एका जबाबदार नेत्याने दिल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.