Phaltan : राष्ट्रवादी आमदाराच्या डोळ्यादेखत भाजपने अख्खा पक्ष संपवला : रणजीतसिंह नाईक निंबाळकरांसमोर सचिन पाटलांचे काहीच चालेना!

Phaltan : फलटणमध्ये आमदार सचिन पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी पक्ष संपत असल्याची टीका होत आहे. पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
NCP MLA Sachin Patil and (Right) BJP leader Ranjitsinh Naik Nimbalkar.
NCP MLA Sachin Patil and (Right) BJP leader Ranjitsinh Naik Nimbalkar.Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan News : भाजपचे माढ्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे आमदार सचिन पाटील यांची मैत्री सर्वश्रृत आहे. पण याच मैत्रीमुळे फलटण तालुक्यात सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा बळी देत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. निंबाळकरांसमोर त्यांचे काहीच चालत नाही, ते म्हणतील त्या प्रत्येक गोष्टीला म् म् म्हणण्याचं काम पाटील करत असल्याचा आरोप होतो. यामुळे कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या फलटण तालुक्यातून राष्ट्रवादी पक्ष संपत चालल्याचे चित्र आहे.

नुकतेच फलटण पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या तिन्ही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पंचायत समितीमधून राष्ट्रवादी पक्षच संपला आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचाच सभापती व्हावा यासाठी ही खेळी खेळली. या दगाफटक्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती होण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिवरूपराजे खर्डेकर यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण अद्याप या घडामोडींवर सचिन पाटील एक शब्दही बोललेले नाहीत.

गत विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांनी तिकीट जाहीर होऊनही ऐनवेळी राष्ट्रवादीची साथ सोडली. यामुळे व्यतित झालेल्या दिवंगत अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना रातोरात राष्ट्रवादीमध्ये घेऊन तिकीट दिले अन् निवडूनही आणले. त्यांच्या विजयामागे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही कष्ट मोठे होते.

NCP MLA Sachin Patil and (Right) BJP leader Ranjitsinh Naik Nimbalkar.
Phaltan Panchayat Samiti : फलटणमध्ये प्रचंड धक्कादायक राजकारण : पंचायत समितीत रामराजे अन् रणजितसिंह निंबाळकरांचा गट एकत्र सत्तेत

राजे गट राष्ट्रवादीपासून दुरावला तरी सचिन पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कायम असल्याचा संदेश गेला. यानंतर पाटील पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील, पक्षाचे नेतृत्व करतील अशी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आशा होती. पण निवडून येताच त्यांनी भाजपधार्जिणी भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. ते राष्ट्रवादीचेच आमदार आहेत हे मंत्री मकरंद पाटील यांना अनेकदा स्पष्ट करावे लागले. स्वतः अजित पवार यांनी एका बैठकीत सचिन पाटलांना समज दिल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादीचे आमदार असूनही विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचीच ताकद वाढल्याचे दिसून येते. फलटण नगरपालिकेत जवळपास अडीच दशके राष्ट्रवादीची सत्ता होती. पण यावेळी तिथे सत्तांतर झाले. नगराध्यक्षपदाची जागा भाजपला गेली, शिवाय पालिकेतही भाजपचे संख्याबळ कमालीचे वाढले. राष्ट्रवादी अवघ्या 4 जागा मिळाल्या. पंचायत समितीमध्ये 16 पैकी अवघ्या 3 आणि जिल्हा परिषदेला 8 पैकी केवळ 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली.

NCP MLA Sachin Patil and (Right) BJP leader Ranjitsinh Naik Nimbalkar.
Phaltan News : फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांचे राष्ट्रवादीला हादरे : शिवरूपराजे खर्डेकरांचा राजीनामा, विक्रमसिंह भोसलेही भाजपमध्ये

यानंतरही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी सव्वा सात महिन्यांसाठी पंचायत समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे खेचून आणले. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी संजीवराजे निंबाळकर यांच्यासोबत चर्चाही केली. पण शिवांजली भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच गुपचूप भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सहाजिकच पुढील सव्वा वर्षे किंवा कदाचित अडीचही वर्षे भाजपचाच सभापती राहू शकतो. या घडामोडींबाबत अद्यापही सचिन पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com