Shivsena-NCP Yuti
Shivsena-NCP Yuti Sarkarnama

Shivsena-NCP Yuti : सोलापुरात मोठी घडामोड; भाजपला शह देत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती

Solapur Corporation Election 2025 : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भाजपमधील नाराजी तीव्र झाली असून शिवसेना-राष्ट्रवादी युती जाहीर झाल्याने महायुतीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Published on
  1. सोलापूर महापालिका निवडणुकीआधी भाजपकडून शिवसेनेला कमी जागा देण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडल्या.

  2. भाजपकडून केवळ १५ जागांची चर्चा सुरू होताच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत थेट युती करण्याचा निर्णय घेतला.

  3. वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने मध्यरात्री शिवसेना–राष्ट्रवादी युती निश्चित झाली आहे.

Solapur, 28 December : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या घडामोडींमुळे दोन्ही देशमुख नाराज झाले आहेत. दुसरीकडे, भाजपकडून शिवसेनेला अवघ्या १५ जागा सोडण्याची चर्चा असतानाच सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड पुढे आली आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती घोषित झाली आहे. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्षांनी निम्या जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वक्षपीय नेतेमंडळी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. विशेषतः महायुतीमधील तीनही पक्षांकडून आक्रमक रणनीती आखली जात आहे. मुंबईसह राज्यभर शिवसेना-भाजपची युती होणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी शिवसेनेने भाजपकडे ४४ जागांची मागणी केली आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा करून कळविण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, भाजपकडून केवळ १५ जागा देण्याची कुणकुण लागताच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपकडून जागा वाटपात गेम होण्याची भीती लक्षात घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यासाठी पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवनागी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या परवानगीने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी चर्चा केली.

Shivsena-NCP Yuti
NCP Politics : अजितदादा-अमोल कोल्हेंची दोन दिवसांची चर्चा निष्फळ : पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचे फिस्कटले

संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. वरिष्ठांच्या कानावर याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे आणि सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर मध्यरात्री शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय निश्चित झाला.

युतीच्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे आणि सुधीर खरटमल तर शिवसेनेकडून माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सहसपंर्कप्रमुख श्री साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, मनोज शेजवाल आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्षांनी निम्या जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Shivsena-NCP Yuti
Nashik Politics : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआ'लाच तडा.. सेना-मनसे एकीकडे तर कॉंग्रेस -राष्ट्रवादी दुसरीकडे

Q1. सोलापूरमध्ये शिवसेना–राष्ट्रवादी युती का झाली?
भाजपकडून अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली.

Q2. शिवसेनेने भाजपकडे किती जागांची मागणी केली होती?
शिवसेनेने भाजपकडे ४४ जागांची मागणी केली होती.

Q3. शिवसेना–राष्ट्रवादी युतीचा निर्णय कधी झाला?
दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री युती निश्चित झाली.

Q4. आता सोलापूर महापालिकेत दोन्ही पक्ष किती जागा लढवणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 51 जागा लढवणार आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com