BJP : ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजप आंदोलन करणार

Jaykumar Gore जयकुमार गोरे यांनी म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ''मोदी '' या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Satara News : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष BJP राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जयकुमार गोरे यांनी म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ''मोदी '' या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.

MLA Jaykumar Gore
Rahul Gandhi News: राहुल गांधींना शिक्षा; पण काँग्रेसमध्ये वेगळीच वातावरण निर्मिती; नक्की घडलयं काय?

सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.

MLA Jaykumar Gore
Satara News : नद्यांचे प्रदुषण वाढले; संवर्धनासाठी कोणते उपाय केले... श्रीनिवास पाटलांचा लोकसभेत आवाज

आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे, असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही आमदार गोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

MLA Jaykumar Gore
Mumbai News: एकाही सरकारकडून माथाडींचे हित जपले गेले नाही : नरेंद्र पाटील यांची खंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com