

Solapur, 06 August : सोलापूर महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला होता. याप्रकरणी भाजप नगरसेविका शालन शंकर शिंदे (रा. जोशी गल्ली, सोलापूर) यांना अटक करण्यात आली. शिंदे यांना तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
मृत बाळासाहेब सरवदे यांची चुलत वहिनी रेखा सरवदे यांनी महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याचवेळी परिसरातील शालन शंकर शिंदे यांनीही अर्ज भरला होता. ता. ०२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी शालन शिंदे व अन्य संशयित आरोपींनी रेखा सरवदेंच्या घरासमोर येऊन ‘तुमचा अपक्ष अर्ज काढून घ्या, नाहीतर तुम्हाला बघून घेतो’ अशी धमकी दिली होती.
त्यावेळी गल्लीत वाद नको; म्हणून रेखा सरवदे यांनी निवडणुकीतून अर्ज काढून घेतला होता, त्यानंतर दुपारी पावणे पाचच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील मृत बाळासाहेब, त्याचा भाऊ बाजीराव सरवदे, आदित्य सरवदे यांच्यासोबत शंकर शिंदेंची मुले व इतर लोकांनी त्यांच्यासोबत भांडण काढले. त्यांच्या हातामध्ये तलवारी, कोयते होते.
शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली, इतरांनी हत्यारांनी वार करून त्यांचा खून केल्याची फिर्याद मृत बाळासाहेब सरवदेंचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याने जेलरोड पोलिसांत दिली होती. त्यावरून शालन शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनासाठी केलेला त्यांचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात फेटाळला होता. नगरसेविका शालन शिंदे यांनी ॲड. रितेश थोबडेंमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वकिलाचा युक्तिवाद ठरला महत्वाचा
‘आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून दोषारूपपत्राचे अवलोकन केले, त्यावेळी सुरुवातीस अपघाती मृत्यू, तसेच साक्षीदारांचे व फिर्यादीचा जबाब सुसंगत नाही’ असे मुद्दे ॲड. थोबडे यांनी मांडले. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी शालन शिंदेला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.