Solapur ZP : ‘शिवरत्न’वरून रणकंदन : भाजपकडून इंद्रजीत पवारांचा सत्कार; तर राष्ट्रवादीने घेतली झेडपी सीईओंची भेट

Shivratna Name Change Issue : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 August : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे शिवरत्न हे नाव हटवून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह असे करण्यात आले आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मोहिते पाटील सत्तेवर असताना शिवरत्न हे नाव देण्यात आले होते, त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावरून भाजपला शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे, असा आरोप होत आहे. तर भाजपकडून वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असून त्यांचे नाव दिले आहे. पण शिवाजी महाराजांचे नाव असते आम्ही ते बदलण्याचा विचारही केला नसता, असे स्पष्टीकरण दिले जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यासाठी केलेला ठराव रद्द करण्यात यावा. अनेक वर्षांपासून प्रचलित असलेले शिवरत्न हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच, संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे शिवरत्न हे नाव हटवून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला. त्याला एकमताने मान्यता दिली आहे. मात्र, त्यावरून जिल्ह्यात वादंग उभे राहिले आहे.

जिल्हा परिषदेतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला सुमारे ४० वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि (स्व.) माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीत शिवरत्न हे नाव देण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपर्यंत झेडपीवर मोहिते पाटील आणि समर्थकांची सत्ता होती. मागील काही वर्षांत बदल झाला होता. मात्र, सभागृहाचे नाव कोणी बदलले नव्हते. मात्र, बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने ते बदलेले आहे.

Solapur ZP
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजेंसह 10 दिग्गज आऊट : गोरे, शंभूराज, मकरंदआबा, बाळासाहेब पाटलांना संधी

जिल्हा परिषदेतील सभागृहाला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव केल्याबद्दल भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार केला. देशाच्या जडणघडणीत अटलजींचे मोठे योगदान आहे, त्यांच्या कार्याची आठवण जपण्याचे काम यानिमित्ताने जिल्हा परिषदेने केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन देऊन सुमारे ४० वर्षांपूर्वी दिलेले सभागृहाचे शिवरत्न हे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

शिवरत्न हे नाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवले असून त्यास ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्याच्या जनभावनांचा अनादर करणारा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Solapur ZP
Satara Dcc Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेसाठी 2011 ठराव : भाजपचे वर्चस्व; फलटण-पाटण वगळता राष्ट्रवादी-भाजप लढत होणार

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाला कोणताही विरोध नसून, त्यांच्या नावाने नवीन वास्तू अथवा सभागृह उभारून त्यास नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र, गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेले शिवरत्न हे नाव कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com