भुंकणारे चावत नसतात : धमकी देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना भाजप जिल्हाध्यक्षांचे उत्तर

आम्ही सोलापुरातच बैठका घेत आहोत, बरडे तुमची ताकद दाखवा.
shrikant deshmukh-purushottam barde
shrikant deshmukh-purushottam bardeSarkarnama

सोलापूर : भुंकणारे चावत नसतात, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. बरडे यांच्या घराजवळ असलेल्या पुणे नाका चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला देशमुख आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिवादन करत आम्ही सोलापुरातच बैठका घेत आहोत, बरडे तुमची ताकद दाखवा, असे आव्हान या दोघांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिले. (BJP district president Shrikant Deshmukh's reply to Shiv Sena's Solapur district chief Purushottam Barde)

दरम्यान, तुम्ही शिवसेना स्टाईलने धमकावत असाल, तर भाजप ही शिवसेनेच्या पुढची आवृत्ती आहे, असे म्हणत श्रीकांत देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात येऊन शक्तीप्रदर्शन करत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन पक्षातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

shrikant deshmukh-purushottam barde
मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना

सोलापुरातील आंदोलनादरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला होता. या मुख्यमंत्र्यांच्या पुतळा दहन आंदोलनाचा जाब विचारात शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी श्रीकांत देशमुख यांना फोनवर अरेरावी करत सोलापुरातील मरी आई चौकात येऊन दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून आज (ता. २७ सप्टेंबर) भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी बरडे यांच्या घराजवळ असलेल्या पुणे नाका चौकात येऊन संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी प्रसार माध्यमाला बोलताना त्यांनी भुंकणारे चावत नसतात, असा टोलादेखील बरडे यांना नाव न घेता लगावला.

shrikant deshmukh-purushottam barde
अजितदादा आपला शब्द खरा करणार : पालिका निवडणुकांसाठी द्विसदस्यीय प्रभाग असणार?

खासदार नाईक निंबाळकर म्हणाले की, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना श्रीकांत देशमुखच बास झाले. बरडे तुम्ही श्रीकांत देशमुख यांच्या सावलीला उभे राहून दाखवा. तुम्हाला काय ताकद दाखवायची ती दाखवा. आम्ही सोलापुरात शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेत आहोत, असे खुले आव्हान खासदार निंबाळकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com