Jayakumar Gore : शिंदे,पवार गटाने कितीही दावा केला तरी; सातारा भाजपचाच...

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघावरून जयकुमार गोरेंनी थोपटले दंड
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचीच उमेदवार निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघावर कोणी कितीही दावा केला तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते असे सांगत माण- खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावरून दंड थोपटले आहे.

महायुतीतील घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपने स्वतंत्रपणे सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने येथील उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच दावा असल्याचे म्हटले होते. तर शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी ही हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. या सर्व चर्चांचे खंडन आमदार जयकुमार गोरे यांनी रविवारी सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत घेत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, भाजप सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने बूथ रचनेची गेल्या तीन वर्षापासून बांधणी करत आहे. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय पक्षनिरीक्षकांचा सातत्याने येथे दौरा सुरू आहे. सध्या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढले असून भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवार लढवणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Nagpur winter session : बांधकाम परवानगी देताय.. ; मग आता 'हेलिकॉप्टर' वापराची पण द्या..!

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. जागा वाटपाच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तिन्ही घटक पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लोकशाहीमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या जागेवर सातत्याने दावा केला जाऊ शकतो. मात्र भाजपचा जिल्हास्तरीय रचनेमध्ये सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणी किती दावा केला तरी सातारा लोकसभेची जागा भाजपचा उमेदवारच लढणार, असे स्पष्टपणे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
BJP MLA Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांच्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

सातारा लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळू शकते, या संदर्भात बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. अधिवेशनानंतर केंद्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये या विषयांची चर्चा होईल वरिष्ठ कार्यकारणी कडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचे आम्ही निश्चितच काम करू.

माढा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भातही बोलताना ते म्हणाले, विद्यमान खासदार आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आमचे चांगले मित्र आहेत. निरा देवधर योजनेला प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरणाचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचा दावा बळकट आहे, पुन्हा त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळाली तर मला मित्र म्हणून निश्चितच आनंद वाटेल.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Sangali Swabhimani News : सांगलीत 'स्वाभिमानी'कडून 'वसंतदादा'चा 'काटा बंद'..!

शिंदे यांनी आपले स्वतःचे बघावे....

महाविकास आघाडीने सुद्धा सातारा जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे या संदर्भात बोलताना ते म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले स्वतःचे बघावे दुसऱ्याचे पक्षात डोके घालू नये.राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत होता हा भूतकाळ झाला आता सध्या परिस्थिती तशी नाही राष्ट्रवादीची ताकद आता दोन गटात विभागली आहे. त्यामुळे भाजपचा बलाढ्य पक्ष ठरलेला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Maratha Vs OBC : 'चारीमुंड्या चित'... ; कोल्हापुरात 'लंगोट'वरून मराठा आंदोलकांनी शेंडगेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com