
सांगलीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजपच आधी निर्णय घेईल असे विधान करून राजकीय खळबळ उडवली.
पाटील यांनी मदनभाऊ पाटील गटाला पुन्हा पूर्ण उमेदवारी मिळेल असे जाहीर केले, ज्यामुळे महायुतीत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीतील जागावाटपावरून मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच सांगलीतील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे. चंद्रकांतदादांनी आधी भाजपच बघणार असून जागा उरल्यातर मित्र पक्षांनाही देवू असे म्हटलं आहे. यामुळे ऐण निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह इतर पक्षामधून भाजपमध्ये गेलेल्यांचे काय होणार असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चीला जातोय. दरम्यान चंद्रकांतदादांनी मदनभाऊ पाटील गटाबद्दल मात्र चांगलेच संकेत दिल्याने जयश्रीताईंना दिलासा मिळाला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या सांगलीत मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. विरोधकांसह महायुतीतील पक्ष आता तयारीला लागले असून दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच चंद्रकांत पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वसंतदादा पाटील घराण्याच्या नात सून, तथा मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या घरी जावून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम उपस्थित होते.
याच भेटीत चंद्रकात पाटील यांनी 2018 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप व मदनभाऊ पाटील गटाच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीतही पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा केली. तसेच ज्या जागा शिल्लक राहतील त्या महायुतीच्या घटकपक्षांना तसेच अन्य पक्षांमधून येणार्या ताकदवान कार्यकर्त्यांना दिल्या जातील. पण ते फक्त भाजपची उमेदवारीवर असेल्यांनाच दिले जाईल असेही जाहीर केले. यामुळे अनेकांची आता गोची होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्यासमवेत भाजपवासी झालेल्या सर्व विद्यमान माजी नगरसेवक तसेच अन्य इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. प्रभागातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी, भाजप आणि मदनभाऊ पाटील गटाच्या सर्व उमेदवारांना उमेदवारी देवू असे जाहीर केले. तर पालिकेवर पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्वांना उमेदवारी द्यावी लागेल. पण भाजप आणि मदनभाऊ पाटील गटाच्या सर्व उमेदवारांना उमेदवारी मिळणार असून आत्तापासूनच कामाला लागा असे आदेश दिले.
तसेच त्यांनी याच्या आधी काहींनी पक्ष प्रवेश केला असून निवडणुकीपर्यंत आणखी काही नगरसेवक भाजपबरोबर येतील. आता मदनभाऊ पाटील गटही सोबत आहे. यामुळे या सर्वांना उमेदवारी दिली जाईल. यातून काही जागा उरल्या तर आपण महायुतीतील घटक मित्रपक्षांना त्या देणार आहोत. तशी चर्चा केली जावू शकते. मात्र याबाबत अद्याप अंतिम काही ठरलेले नाही. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच त्यावर बोलता येईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कुपवाडचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपसाबेतच काम करत होते आता ते अधिकृत पक्ष सदस्य झाल्याचे मगदूम यांना तत्काळ उमेदवारीचा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
अवटींची भूमिका महत्वाची
या भेटीनंतर आता महायुतीतील मित्र पक्षांना भाजपने डिवचण्याचे काम केल्याची सध्या चर्चा आहे. तसेच याच भेटीवेळी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते सुरेश आवटी, चिरंजीव निरंजन आवटी आणि संदीप आवटी उपस्थित होते. भाजपमध्ये असूनही आवटी यांनी महापालिका निवडणुकीसाठी जनसंघर्ष विकास आघाडीची स्वतंत्र नोंद केली आहे. यामुळे आवटी भाजपसोबत राहणार की विरोधकांशी हात मिळवणार हे याकडे आता सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.
1. चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय विधान केलं?
त्यांनी सांगितले की, “आधी भाजपच बघेल, जागा उरल्यास मित्र पक्षांनाही दिल्या जातील.”
2. हे विधान कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आले?
आगामी सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.
3. मदनभाऊ पाटील गटाबाबत काय निर्णय जाहीर झाला?
मदनभाऊ पाटील गटाच्या सर्व उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
4. या वक्तव्यावर महायुतीत काय प्रतिक्रिया उमटल्या?
या विधानामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
5. सांगलीतील राजकीय वातावरण कसे आहे?
सांगलीत निवडणुकीपूर्वी भाजप व मित्र पक्षांमध्ये जागावाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.