Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : शिंदेंच्या सल्ल्यानंतरही; धंगेकरांचा चंद्रकांतदादांवर थेट हल्ला, म्हणाले,' माझ्यावर मकोका..'

Ravindra Dhangekar big allegations on Chandrakant Patil : पोलीस माझ्यावर मकोका लावण्याच्या तयारीत, फक्त आदेशाची वाट बघतायत : धंगेकरांचा चंद्रकांतदादांवर थेट हल्ला
 Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar press Conference Ravindra Dhangekar press Conference
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री गणात शिंदे यांनी आता दंगे बंद करा अशी सूचना गेल्यानंतर देखील शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजपशी पंगे घेण्याचं सोडलेलं नाही. रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं असून चंद्रकांत पाटील हे आपल्या विरुद्ध षडयंत्र आखत असल्याचा आरोप केला आहे.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना धंगेकर, घायवळ टोळीतील सदस्य हे चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला असतात. त्याचा खुलासा चंद्रकांत पाटलांनी करावा हा माझा प्रश्न होता. पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा एक माझा विषय होता. इंटरपोलसारख्या संस्थेला घायवळ प्रकरणी मदत करा म्हणून पोलिसांना विनंती करावी लागते. याला चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असलेले लोक जबाबदार आहेत.

तुमच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार तुमचा सपोर्ट घेऊन गुन्हेगारी करत असतील तर तुम्ही खुलासा करावा हा माझा चंद्रकांत पाटलांना साधासा प्रश्न होता. हा प्रश्न विचारताना समीर पाटील नावाचा व्यक्ती चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचं समोर आलं. तसेच चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारल्यावर समीर पाटीलला राग आला.

समीर पाटील कोण आहे हे शोधत असताना त्याच्यावर सांगलीत मकोका आणि फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचं कळलं. समीर पाटील हा गुन्हेगारी चालवतो. कुणावर गुन्हे दाखल करायचे असतील तर समीर पाटील पोलिसांना आदेश देतो. मग, मी घायवळवर बोलत असताना भाजपची लोक माझ्यावर हल्ला करत आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

 Ravindra Dhangekar
Rohit Patil NCP : रोहित पाटलांना आता राज्याचा नेता करणार? शरद पवार नवी जबाबदारी देण्याच्या तयारीत

समीर पाटील हा आर आर पाटलांचा काम बघत होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता. आता तेच काम समीर पाटील हा कोथरूडमध्ये करतोय. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून समीर पाटील हा माझ्यावर गुन्हे दाखल करून मकोका लावण्याचा प्रयत्न करतोय.

 Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : धंगेकर शिंदेंचंही ऐकण्याच्या मुडमध्ये नाहीत... चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्यासाठी पुढचा बॉम्ब तयार

या कौटुंबिक हल्या सोबतच माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची देखील षडयंत्र आखल जात आहे. चार पाच गुन्हे दाखल करून माझ्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन असून मला तडीपार देखील करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील हे समीर पाटील यांच्यामार्फत हे करत असल्याचा देखील गौप्यस्फोट धंगेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com