नेवासे (जि. नगर) : भारतीय जनता पक्षाचे (bjp) खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे निकटवर्तीय भाजप शिलेदारांनी शिवसेना (shivsena) नेते व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची धुरा सांभाळणाऱ्या शिलेदारांचा हा शिवसेना प्रवेश म्हणजे मंत्री गडाखांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिलेला ‘जोर का झटका’ समजला जातो. (BJP leaders from Nevasa join Shiv Sena)
नेवासे बुद्रुक येथे शनिवार (ता. १५ जानेवारी) मंत्री शंकरराव गडाख उपस्थितीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष, नेवासे बुद्रुकचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पस्तीस ते चाळीस भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचा बालेकिल्ला असलेला नेवासे बुद्रुक परिसरात होत असलेले परिवर्तन हे भाजपला पर्यायाने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे, असे राजकीय वर्तुळातून मानले जात आहे.
नेवासे बुद्रुक येथे मंत्री शंकरराव गडाख यांनी खंडोबा देवस्थान तसेच विविध कामासाठी भरघोस निधी दिला आहे. या पूर्वी शनीशिंगणापूर, भानसहीवरे , शिंगवे तुकाईचे, खुपटी, कुकाणे व नेवाशासह तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री गडाखांचे नेतृत्व मान्य करत हाती शिवबांधन बांधलेले आहे.
नेवासे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विरोधानकांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले, तरी मी या मंत्रिपदाचा वापर नेवासे तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून कामे मार्गी लावण्यासाठी करणार आहे, असे राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.