Karad Politic's : पवारांच्या शिलेदारासह भाजप नेत्यांनी वाढविले ॲड उदयसिंह उंडाळकरांचे टेन्शन; शेवटच्या दिवशीच्या अर्जाने धाकधूक वाढली

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँकेच्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात चुरस वाढली आहे. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या उमेदवारीनंतर बाळासाहेब पाटील आणि भाजपच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने समीकरणे बदलली आहेत.
Udaysinh patil undalkar
Udaysinh patil undalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

karad, 02 October : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सध्‍या कऱ्हाड सोसायटी गटातील उमेदवार चर्चेत आहेत. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अर्ज दाखल केल्‍यानंतर अखेरच्‍या दिवशी राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्‍यासह भाजपच्‍या अन्‍य तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत, त्‍यामुळे ॲड. उंडाळकरांचे टेन्‍शन वाढवल्‍याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा उमेदवारी अर्ज आमदार डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत दाखल झाला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ, बाजार समितीचे संचालक जगदीश जगताप, भाजपचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांचेही अर्ज दाखल झाले आहेत.

महायुती म्हणून सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक लढण्याची नेत्यांची तयारी आहे. मात्र, राष्ट्रवादी व भाजपकडून दाखल झालेले अर्ज हे भाजपच्या नेत्यांसह ॲड. उंडाळकरांचे टेन्शन वाढवणारे आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील ११ सोसायटी मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड सोसायटी गटातील ही निवडणूक केवळ उमेदवारांची स्पर्धा न राहता विविध राजकीय गटांच्या ताकदीची चाचणी ठरणार आहे.

Udaysinh patil undalkar
Solapur Dcc Bank : कर्नाटकातील व्यक्तीचा सोलापूर DCC बॅंकेसाठी ठराव; भाजपतील बड्या नेत्याच्या समर्थकांकडून ‘दक्षिण’मधील ठरावांवर हरकती

विशेषतः राष्ट्रवादीचे ॲड. उंडाळकर यांचा अर्ज भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल झाल्याने महायुतीच्या संभाव्य रणनीतीची चर्चा सुरू होती. त्यातच भाजपकडूनच अन्य तीन अर्ज दाखल झाल्याने अंतिम उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या गटातील अर्जांची संख्या वाढली असली तरी अंतिम लढतीचे चित्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल.

कऱ्हाड सोसायटी गटातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही या गटातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कऱ्हाड तालुक्यातील राजकीय प्रभाव लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे कऱ्हाड सोसायटी गटात सध्या उमेदवारीपेक्षा अंतिम उमेदवार कोण? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

Udaysinh patil undalkar
Satara Dcc Bank : सातारा Dcc च्या आखाड्यात 4 मंत्री, 2 खासदार, 3 आमदार, 2 माजी मंत्री, माजी खासदार-आमदार उतरले; बॅंकेच्या 21 जागांसाठी 236 अर्ज दाखल

राजकीय समझोता होणार का?

महायुतीच्या संभाव्य रणनीतीला अर्जांच्या वाढलेल्या संख्येने पेच निर्माण केला आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या टप्प्यावर कोण कोणाच्या पाठीशी उभे राहते, कोण माघार घेते आणि कोणता राजकीय समझोता आकार घेतो? यावर या गटातील अंतिम लढतीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com