Satara Dcc Bank : सातारा Dcc च्या आखाड्यात 4 मंत्री, 2 खासदार, 3 आमदार, 2 माजी मंत्री, माजी खासदार-आमदार उतरले; बॅंकेच्या 21 जागांसाठी 236 अर्ज दाखल

Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी चार मंत्री, खासदार, आमदार आणि माजी खासदारांसह दिग्गजांनी अर्ज भरले. २१ जागांसाठी २३६ इच्छुकांनी अर्ज केले.
Satara Dcc Bank Election
Satara Dcc Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 02 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार मंत्री, एक खासदार, एक आमदार, माजी खासदार यांच्यासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले. बॅंकेच्या २१ जागांसाठी एकूण २३६ इच्छुकांनी, तर शेवटच्या दिवशी १२९ जणांनी १६९ अर्ज दाखल केले आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार डॉ अतुल भोसले, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विद्यमान संचालक तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण हे सातारा डीसीसी बॅंकेच्या आखाड्यात उतरले आहेत.

येत्या सोमवारी बॅंकेच्या अर्जांची छाननी होणार असून, सहा ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून दुपारी चारपर्यंत दिग्गज नेत्यांनी समर्थकांसह येऊन अर्ज दाखल केले. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शनच पाहायला मिळाले. बॅंकेवर संचालक होण्यासाठी तब्बल २३६ इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Satara Dcc Bank Election
Shivendraraje Bhosale : ...तर सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते : शिवेंद्रराजेंचं मोठं विधान

शेवटच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, शेखर गोरे, शिवरूपराजे खर्डेकर, ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर, सुनेत्रा शिंदे, डी. के. पवार, काका धुमाळ, सुरेंद्र गुदगे, सुरभी भोसले, अविनाश कदम, नितीन भरगुडे-पाटील आदींसह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.

आज दाखल झालेल्या १६९ अर्जांमध्ये सोसायटी मतदारसंघातून फलटण पाच, वाई पाच, खंडाळा आठ, माण चार, खटाव चार, कोरेगाव चार, पाटण पाच, कऱ्हाड चार, महाबळेश्वर एक, जावळी आठ, सातारा तीन अशा ५१ उमेदवारांनी अर्ज भरले. राखीव मतदारसंघातून महिला राखीवमधून १९, ओबीसी प्रवर्गातून २३, अनुसूचित जाती प्रवर्गातून १३, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून १७ असे ७२ अर्ज भरले गेले.

औद्योगिक विणकर, मजूर संस्था मतदारसंघातून २१, गृहनिर्माण आणि दुग्धसंस्था मतदारसंघातून तीन, बॅंका व पतसंस्था मतदारसंघातून १६, कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून दोन, खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून चार असे एकूण ४६ अर्ज दाखल झाले.

Satara Dcc Bank Election
Satara Dcc Bank : शिवेंद्रराजेंनी सांगितली सातारा डीसीसी बॅंकेतील जागावाटपाची स्ट्रॅटेजी; ‘त्या’ 10 जागांवरच ठरणार महायुतीचे भवितव्य

ओबीसी प्रवर्गातून सर्वाधिक अर्ज

सर्वाधिक २१ उमेदवार इतर मागास प्रवर्गातून असून, त्यापाठोपाठ मजूर संस्था मतदारसंघातून २१, महिला राखीवमधून १९, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून १७ अर्ज दाखल आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com