Supriya Sule : एकनाथ शिंदेंच्या दिल्ली सत्कारानं ठाकरे शिवसेना दुखावली; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

NCP SharadChandra Pawar Party MP Supriya Sule DCM Eknath Shinde Delhi Baramati : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी दिल्लीत केलेल्या सत्कारावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत झालेल्या सत्कारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष कमालीचा नाराज आहे.

खासदार संजय राऊत यांनी यावरून भावना व्यक्त करताना शरद पवार यांच्या राजकारणाकडे बोट दाखवले होते. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती (Baramati) इथं पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "अर्थात ते दुखवले गेले असतील. आमच्या आघाडी किंवा विरोधक जर असेल, तर एखाद्या सुसंस्कृत राजकारणामध्ये, फक्त चव्हाणसाहेबांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही. त्याच्यासाठी कृती देखील केली पाहिजे. शिवसेनेचे काही नेते दुखवले गेले असतील, मी त्यांच्याशी दिल्लीत देखील चर्चा केली. आम्ही सगळे मिळून एकमेकांना दुखवले जाणार नाही, यासाठी प्रयत्न करू".

Supriya Sule
Shivsena Politics : 'राजा का बेटा राजा नही बनेगा'; उदय सामंत यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रवेशांवर सूचक विधान

कुंभमेळाव्यात दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर कुठतरी मिस मॅनेजमेंट सुरू आहे. अशा घटना होणे खूपच दुर्दैवी आहे. मिस मॅनेजमेंटवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे सांगितले.

Supriya Sule
Shivsena Politics : शिंदेंच्या शिलेदाराच्या विधानानं बंडखोरीचे धुमारे; 'स्थानिक'साठी महायुती झाली तरी, 'एकला चलो रे'ची तयारी!

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना खासदार सुळे यांनी आमचे सरकार आले असते, तर कोणालाही वगळले नसते. आम्ही तर तीन हजार रुपये देणार होतो. आता महायुती सरकार अडीच लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या महिलांना वगळणार आहे. ही योजना फक्त सत्तेसाठी होते, हे आता दिसू लागल्याचे म्हटले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महायुतीमधील भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मोठा निर्णय घेतला होता. आता निर्णयाची वाट पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे म्हटले होते. आता राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत काय निर्णय होतो, याची वाट पाहू, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com