Shivsena Politics : 'राजा का बेटा राजा नही बनेगा'; उदय सामंत यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रवेशांवर सूचक विधान

Konkan Minister Uday Samant Eknath Shinde ShivSena third phase Maharashtra Operation Tiger : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तिसऱ्या टप्प्यांतील प्रवेशावर नेते तथा मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा सर्वाधिक फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.

आता तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी तिसऱ्या टप्प्यातील पक्ष प्रवेशांबाबत सूचक विधान करताना, 'राजा का बेटा राजा नही बनेगा', असे म्हटले आहे. सामंत यांच्या या विधानामुळे तिसर्‍या टप्प्यातील पक्ष प्रवेशांची उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अनेक बड्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याचा सर्वाधिक फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला बसला.

Uday Samant
Shivsena Politics : शिंदेंच्या शिलेदाराच्या विधानानं बंडखोरीचे धुमारे; 'स्थानिक'साठी महायुती झाली तरी, 'एकला चलो रे'ची तयारी!

कोकणातील अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरेंची शिवसेना पुरतील घायाळ झाली असतानाच, शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ऑपरेशन टागयरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. यानुसार अनेक बड्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होणार आहे. पण त्यांची नावे सांगितली जाणार नाहीत. पक्ष प्रवेशापूर्वी ही नावे सांगितली जातील. 'राजा का बेटा राजा नही बनेगा, पण कार्यकर्त्यांना मोठे करायचे आहे. एखादा नेता मोठा होत असेल तर त्याचे पाय छाटायचे नसतात', असे सामंत यांनी म्हटले आहे.

Uday Samant
Ajit Pawar : राज ठाकरेंवरचा राग अजितदादांनी मनसैनिकावर काढला! म्हणाले, 'जाऊन सांग तुझ्या नेत्याला'

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुढचा कोणाचा नंबर, अशी चर्चा आहे.

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे झालेले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत लवकरच कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावर उदय सामंत यांनी एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले, तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. परंतु नेमलेले नवीन पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता घ्या, असा टोला देखील सामंत यांनी ठाकरेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com