Vasant More : कोण वसंत मोरे? नितेश राणेंची टीका तात्यांच्या जिव्हारी, तात्यांनी थेट पिक्चरच दाखवला

Vasant More on Nitesh Rane's Controversial Statement: शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या आघोरी पूजेच्या वादावरून सुरू झालेल्या वाद आता कोण वसंत मोरे? इथं पर्यंत येऊन ठेपला आहे. भाजप मंत्री नितेश राणेंची टीका वसंत मोरेंच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.
Shivsena UBT Vasant Nitesh Rane And Bharat Gogawale
Shivsena UBT Vasant Nitesh Rane And Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Vasant More vs Nitesh Rane: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्यावर आघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता. याबाबत भाजप मंत्री नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोण वसंत मोरे? आपण त्यांना ओळखत नाही, असं सांगितलं होतं. नितेश राणेंनी केलेली ही टीका तात्यांच्या चांगली ज्वारी लागली असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडली, असं गोगावले म्हणाले होते.

या आरोपानंतर उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. तर वसंत मोरे यांनी देखील गोगावले यांच्यावर गंभीर आरोप करताना आघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. त्यांनी, गोगावले यांनी, विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशमधील उज्जैन येथील बगलामुखी देवी येथील देवस्थान मधील पुजाऱ्यांच्या माध्यमातून अघोरी पूजा केली होती, असा आरोप केला होता.

वसंत मोरे म्हणाले होते की, "17 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी 11 पुजाऱ्यांना खास बोलवून आपल्या घरी अघोरी होम-हवन घडवून आणले होते." त्यांनी या संदर्भात काही व्हिडिओ क्लिप्स देखील सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Shivsena UBT Vasant Nitesh Rane And Bharat Gogawale
Vasant More: '17 तारीख, 11 पुजारी अन् भरत गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा...'; वसंत मोरेंनी फोटो, व्हिडिओसह केलेल्या गंभीर आरोपांनी खळबळ

याबाबत भाजप नेते नितेश राणे यांना विचारलं असता त्यांनी वसंत कोण? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. त्यावर आधी मनसेमध्ये असलेले आता ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे असं पत्रकारांनी त्यांना सांगितलं. त्यावर आता कुठे आहे ते? असे विचारना करत आपण त्यांना ओळखत नसल्याचं नितेश राणे म्हणाले होते.

ही गोष्ट वसंत मोरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी नितेश राणे यांच्या प्रतिक्रिये नंतर सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर करत ही इज अ बॉस ऑफ बॉस आशयाचं गाणं लावून आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं लेखाजोखा व्हिडिओतून मांडला आहे. तसेच व्हिडिओची सुरुवात नितीश राणे यांनी कोण वसंत मोरे म्हणून विचारलेल्या प्रश्नापासून केली आहे. तर व्हिडिओचा शेवट नितेश राणे आणि वसंत मोरे यांच्यात झालेल्या भेटीने झाला आहे.

याबाबत व्यक्त होताना वसंत मोरे म्हणाले, 'साहेब आम्ही गरिब शेतकऱ्यांच्या घरची लेकरं... आम्ही राजकारणात येताना आमच्या मागे ना कुणाचा वसा होता ना कुणाचा वारसा घेऊन आम्ही जन्मलो...,

Shivsena UBT Vasant Nitesh Rane And Bharat Gogawale
Vasant more promise : पुणे महापालिकेत ठाकरेंचा महापौर झाला तर..,वसंततात्यांनी थेट आईची शपथ घेऊन पुणेकरांना दिला मोठा शब्द

आम्ही आमचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही पुढाऱ्याने ओळखू दे अथवा ना ओळखू दे आमची मायबाप जनता आम्हाला ओळखते हीच आमच्या कामाची पोच पावती... असल्याचं वसंत मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com