Vasant More
Vasant More Sarkarnama

Vasant more promise : पुणे महापालिकेत ठाकरेंचा महापौर झाला तर..,वसंततात्यांनी थेट आईची शपथ घेऊन पुणेकरांना दिला मोठा शब्द

Thackeray Pune Mayor News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिगुल आता वाजले असून पुणे महापालिकेची प्रभाग रचना करण्यासाठीच्या सूचना सरकारने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
Published on

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेल्या वसंत मोरे यांनी देखील सुरुवातीला पुण्यामध्ये ठाकरे सेनेचाच विरोधी पक्षनेता असेल, असा दावा केला होता. मात्र, आता वसंत मोरे पुणे महापालिकेमध्ये ठाकरे सेनेचा महापौर बसवण्याचे स्वप्न पाहत असल्याचे समोर आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिगुल आता वाजले असून पुणे महापालिकेची प्रभाग रचना करण्यासाठीच्या सूचना सरकारने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. इकडे प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे राजकीय पक्षांकडून देखील निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. नुकतीच ठाकरेंच्या सेनेकडून महापालिका निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. प्रत्येक विधानसभानिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या.

Vasant More
BJP Local Body Elections 2025: ‘स्थानिक स्वराज्य’साठी भाजपचा पुन्हा ‘माधव पॅटर्न’

इकडे बैठकांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे मात्र वसंत मोरे (Vasant More) यांना महापालिकेमध्ये ठाकरे सेनेचा महापौर बसवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी मोरे यांनी पुणे महापालिकेमध्ये ठाकरे सेना ही 50 पेक्षा अधिक जागा जिंकणार आणि ठाकरे सेनेचा विरोधी पक्ष नेता होणार असा दावा केला होता.

Vasant More
MNS-Shivsena UBT : मनसेचे शहराध्यक्ष थेट पोहोचले उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेवर! डोंबिवलीत मनोमिलन; ठाकरे बंधु एकत्र येणार?

त्यानंतर वसंत मोरे यांनी या दाव्यावरती अधिक बोलत आपणच आगामी काळामध्ये आपणच पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते असून असे देखील सांगितले होते. मात्र सध्या सोशल मीडियावर वसंत मोरे यांनी केलेली पोस्ट व्हाययरल होत आहे. या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी चक्क ठाकरे सेनेचा महापौर होण्याचे स्वप्न पहात असल्याचं समोर आला आहे.

Vasant More
Shiv Sena MNS Alliance : उद्धव-राज भाऊ भाऊ, झाले गेले विसरून जाऊ..!

पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले महापालिका निवडणुकीचे बिगुल आज वाजले आहे. प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आजच्या पहिल्याच दिवशी मी सांगतो की, या पुणे शहरातील जनतेने जर आम्हाला शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भरभरून प्रतिसाद दिला आणि या महानगरपालिकेत जर आमच्या पक्षाचा महापौर झाला तर माझ्या आई शपथ सांगतो. पुणे शहरातील महानगरपालिकेची प्रत्येक शाळा मी कात्रज परिसरात उभ्या केलेल्या शाळेप्रमाणे अशाच पद्धतीने सुसज्ज करून गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन वसंत मोरे यांनी दिले आहे.

Vasant More
BJP Politics: महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर? विरोधक झाले सावध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com