Karad Politic's : भाजप आमदार अतुल भोसलेंच्या धक्कातंत्राने स्थानिक आघाड्यांची उडाली झोप...

Nagar Palika Election 2025 : कराड नगरपालिकेतील राजकारणात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी भाजप प्रवेशाचे धक्कातंत्र वापरत अनेकांचे पक्षप्रवेश घडवले. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे आणि आघाड्या नव्याने आखल्या जात आहेत.
Atul Bhosale
Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on
  1. भाजपचा धक्कातंत्राचा वापर: आमदार डॉ. अतुल भोसले यांनी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत शहरातील राजकारणात खळबळ उडवली आहे.

  2. स्थानिक आघाड्यांमध्ये गोंधळ: काँग्रेस, लोकशाही, जनशक्ती आणि यशवंत विकास आघाड्या आपल्या रणनीती ठरवत असल्या तरी नगराध्यक्षपदासाठीचा चेहरा अद्याप अस्पष्ट आहे.

  3. भाजप एकमताने सज्ज; काँग्रेस विस्कळीत: भाजपमध्ये नेतृत्वावर एकमत असताना काँग्रेसमध्ये गोंधळ आणि नेतृत्वाचा अभाव स्पष्ट दिसत आहे.

Karad, 20 October : कराड नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात धक्कातंत्राचा वापर करत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी अनेकांचे भाजप प्रवेश घडवून आणले आहेत. त्यात माजी नगरसेवकांसह समाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपची रणनीती निश्‍चित असली, तरी पक्षप्रवेशाच्या धक्कातंत्राचे दूरगामी परिणाम शहरात दिसतील, अशी स्थिती आहे.

भाजपच्या (BJP) या खेळीने स्थानिक आघाड्यांना आव्हान दिले आहे. त्यातही काँग्रेससह यशवंत-जनशक्ती, लोकशाही, लोकसेवा आदी आघाड्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, असे सध्याचे वातावरण असले, तरी त्यांच्या विरोधात कोण? हे गुलदस्त्यात आहे. भाजपसह काँग्रेस, लोकशाही कोणाला संधी देणार? याची उत्सुकता आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने भाजप, काँग्रेससह (Congress) स्थानिक आघाड्यांकडून चाचपणी सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. तरीही स्थानिक आघाड्यांना प्राधान्य द्यावे का? याचा भाजपसह काँग्रेसही अंदाज घेत आहेत. दोन्ही पक्षांनी त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही राबवली आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी, राजेंद्र यादवांची यशवंत व अरुण जाधव यांच्या जनशक्ती आघाडीचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

स्थानिक आघाड्यांनीही गटबांधणी सुरू केली आहे. लोकशाही आघाडीने शहराच्या विकासासाठी स्थानिक नेत्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेत काँग्रेस आणि भाजपकडून स्वबळासाठी इच्छुकांशी संपर्क साधला जात आहे. बैठका, थेट भेटींवर त्यांचे काम सुरू आहे. पक्षीय पातळीवर होणाऱ्या अनेक गोष्टी राजकीय पटलावर गांभीर्याने घेतल्या जात आहेत. त्यातूनच भाजपमध्ये पक्षप्रवेशही सुरू आहेत.

Atul Bhosale
Phaltan Politic's : रामराजे गटापुढे अस्तित्वाची लढाई; तर इनकमिंग वाढलेल्या माजी खासदारापुढे हे मोठे चॅलेंज

राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भूमिका काही प्रभागांत प्रभावशील राहील. सध्या तरी ते यादवांसोबत आहेत. चर्चेतील नावे नगराध्यक्ष निवड यावेळीही जनतेतून होत आहे. यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांकडून लाँचिंगही होत आहे. त्यांची स्वतंत्र आघाडी आहे. नगराध्यक्षपदासाठी ते असतील, असे वातावरण आहे.

भाजप, काँग्रेससह अन्य कोणत्याच स्थानिक आघाडीने नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण? याची चर्चा केलेली नाही. लोकशाहीकडून माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेली नाही. काँग्रेसची स्थिती बिकट आहे. माजी शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांच्याकडे पाहिले जात असले, तरी ते निवडणूक लढवतीलच, याबाबत साशंकता आहे.

एमआयएमची २०१६ प्रमाणे एन्ट्री झाल्यास माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगारही उमेदवार असू शकतात. जनशक्ती आघाडीकडून शारदा जाधव, अरुण जाधव यांची नावे चर्चेत असली, तरी सध्या त्या गटाला कधी भाजपसोबत, तर कधी राष्ट्रवादीसोबत जोडले जात आहे. त्यामुळे त्याचीही शाश्वती नाही. भाजपचा चेहरा कोण? हेही गुलदस्त्यात आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत.

भाजपमध्ये एकमत; काँग्रेसमध्ये विसंगती

नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल, असा निर्धार करत पालिकेची सत्ता काबीज करण्याचाही निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या नेत्या स्मिता हुलवान, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र ऊर्फ अप्पा माने, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांना भाजपमध्ये घेतले आहे. आमदार डॉ. भोसले त्यासाठी सक्रिय आहेत. भाजपचे उपाध्यक्ष पावसकर यांची त्यांना साथ आहे.

Atul Bhosale
Gopichand Padalkar : पडळकरांच्या निशाण्यावर पुन्हा जयंत पाटील; ‘राजारामबापू साखर कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही; इथं संघर्ष अटळ...’

त्या उलट स्थिती काँग्रेस गोटात आहे. तेथे सध्या शांतता आहे. नेतृत्व कोणी करायचे, हाच मुद्दा आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे हे काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना शहरात लक्ष घालावे लागेल. भाजपमध्ये नेतृत्वावर एकमत, तर काँग्रेमध्ये विसंगती आहे. स्थानिक आघाड्यांच्या नेतृत्वामध्ये यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे बाळासाहेब पाटील, जनशक्तीचे अरुण जाधव हे निश्‍चित आहे.

Q1. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची सध्याची रणनीती काय आहे?
A1. भाजपने धक्कातंत्र वापरून माजी नगरसेवकांना पक्षात घेत शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची तयारी केली आहे.

Q2. नगराध्यक्षपदासाठी कोणाची चर्चा आहे?
A2. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव आणि लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

Q3. काँग्रेसची सध्याची स्थिती कशी आहे?
A3. काँग्रेसमध्ये नेतृत्वावर मतभेद असून उमेदवार निवडीबाबत अनिश्चितता आहे.

Q4. या निवडणुकीत निर्णायक भूमिका कोण बजावू शकते?
A4. स्थानिक आघाड्यांची गटबांधणी आणि एमआयएमसारख्या छोट्या पक्षांची भूमिका निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com