Women Congress leadership: महापालिकेची निवडणूक तोंडावर, महिला शहर काँग्रेस अध्यक्षांना ठेवले होल्डवर

Nagpur City Congress president controversy : नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना महिला काँग्रेसचे कामकाज तब्बल आठ महिन्यांपासून ठप्प पडले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Pune Congress Politics
Pune Congress PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. नाना पटोले यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या यासोबतच महिला काँग्रेसची कार्यकारिणीसुद्धा बरखास्त करण्यात आली होती. शुक्रवारी महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र नागपूर शहराला होल्डवर ठेवण्यात आले आहे. नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना महिला काँग्रेसचे कामकाज तब्बल आठ महिन्यांपासून ठप्प पडले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षही बदलण्यात आल्या होत्या. नॅश अली या युवा महिलेला शहराचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्या मध्य नागपूरच्या विधानसभा मतदारसंघाच्या दावेदार मानल्या जात होत्या. शेवटपर्यंत त्यांचे नावही चर्चेत होते. तत्पूर्वी त्यांचा कार्यकाळ संपायच्या आतच नंदाताई पराते यांची मध्येच अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीसुद्धा मध्य नागपूरमधून विधानसभेकरिता दावेदारी केली होती. त्यामुळे आजी-माजी अध्यक्षांमध्ये येथ स्पर्धा सुरू होती.

Pune Congress Politics
OBC Politics : 'भुजबळांनी असं करायला नको होतं...', महाएल्गार सभेतील वडेट्टीवारांच्या व्हिडिओ प्रकरणावर OBC महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

मध्य नागपूरमध्ये हलबा समाज आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. हे बघता एका महिलेला काँग्रेस संधी देईल असाच अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मागील निवडणुकीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. महाराष्ट्रातील विधानसभा तिकीट वाटपाच्या शेवटच्या टप्यात सर्व वाटाघाटी राहुल गांधी यांनी आपल्या हातात घेतल्या होत्या. बंटी शेळके यांचा रेकॉर्ड बघून पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला.

Pune Congress Politics
OBC DNA : ‘ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका : भुजबळांनी आता थेट फडणवीसांशीच पंगा घेतलाय !

त्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांना हटवण्यात आले. त्याचवेळी महिला काँग्रेसची कार्यकारिणीसुद्धा बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून नागपूरमध्ये महिला अध्यक्ष व कार्यकारिणीच अस्तित्वात नाही. तब्बल आठ महिन्यानंतर महिला प्रदेशची कार्यकारिणी पक्षाने जाहीर केली. प्रदेशाध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. काही शहरांचे अध्यक्षही जाहीर करण्यात आले आहे. त्यात नागपूर शहराचा समावेश नाही.

Pune Congress Politics
OBC leaders conflict : भुजबळांनी एका व्हिडीओतून वडेट्टीवारांचं विमान जमिनीवर आणलं... ओबीसी नेत्यांमध्ये पुन्हा बिनसलं!

नागपूर महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. भाजप व इतर पक्ष कामाला लागले आहेत. मात्र नागपूरमध्ये कार्यक्रमांचा काही ठावठिकाणा नाही. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सर्वांना सदस्य नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. नागपूरच्या अध्यक्ष नंदा पराते यांनी सर्वाधिक अकराशे सदस्यांची नोंदणी केली. ही नोंदणी प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या सदस्य नोंदणीपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. असे असताना त्यांचेही नाव जाहीर करण्यात आले नाही.

Pune Congress Politics
Sharad Pawar NCP: तब्येतीच्या कारणाहून राजीनामा घेतलेल्या रेखा खेडकर म्हणतात 'मी ठणठणीत...'; राजीनाम्यामागे कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com