Bjp MLA On Jayant Patil : लायकी, क्षमता काढत फडणवीसांच्या लाडक्या आमदारानं जयंत पाटलांना डिवचलं

Gopichand Padalkar On Jayant Patil : महाविकास आघाडीचे सरकार असताना जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते. पण दुष्काळग्रस्त सांगलीकरांसाठी त्यांनी काहीच केलं नाही असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील मातब्बर नेते मंत्रिमंडळात होते. पण त्यांना सांगलीत एखादा मोठा प्रकल्प देखील आणता आला नाही. त्यांना सांगलीचा दुष्काळ घालवता आला नाही, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. तसेच पडळकर यांनी कृष्णाकाठच्या वसंतदादासह इतर नेत्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. ते एका सत्कार कार्यक्रमात रविवारी (ता.19) बोलत होते.

सांगली शहर धनगर समाजाच्या वतीने रविवारी स्टेशन चौकात आमदार गोपीचंद पडळकर, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कृष्णाकाठच्या वसंतदादासह इतर नेत्यांनी सांगलीवर अन्याय केला. तेच सांगलीचे मातब्बर नेते असणाऱ्या माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही केल्याचा आरोप पडळकर यांनी केला. तर या नेत्यांमध्ये काम करण्याची वृत्तीच नव्हती, अशी जहरी टीका देखील पडळकर यांनी केली.

या पडळकर म्हणाले, कधीकाळी माझ्यावर खोट्या केसेस टाकून कारागृहात टाकले होते. पण आज स्टेशन चौकात माझा सन्मान होतोय. जी अभिमानाची बाब आहे. मी एका ध्येयाने वाटचाल केल्यामुळे आज आमदार झालो असेही ते म्हणाले. तर लोकप्रतिनिधी म्हणून मी जिल्ह्यातील अनेक विषय मांडले. मात्र हा जिल्हा दोन पुढाऱ्यांचा असल्याचे बोलले जाते. मात्र या दोन्ही नेत्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या विचाराचा काहीच फायदा झाला नाही. यामुळे आता परिवर्तन होण्याची गरज आहे.

Jayant Patil
Jayant Patil : नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात! जयंत पाटलांचे ट्विट, काय म्हणाले?

पडळकर यांनी, जिल्हा बँक ही आर्थिक वाहिनी असून यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. कारवाई का होत नाही असा सवाल केला. तर येथील नेते सभासदांच्या मालकीचे महांकाली, माणगंगा कारखाने गिळंकृत करत असल्याचा दावा केला आहे. तर यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका करताना पडळकर म्हणाले, तुतारी आपलं पारंपारिक वाद्य असूनही आज फक्त एका माणसामुळे के बदनाम होत आहे. हे आता राज्यातील जनता बघत आहे.

यावेळी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना पडळकर यांनी, तुम्ही 11 हजार मतांनी निवडून आलात. जे पडल्या सारखेच आहे. त्यांना आपण किती मतांनी आलो याच्यापेक्षा आर आर पाटील यांचा मुलगा आमदार याचे दुखणे असल्याचा दावा केलाय. तर जयंत पाटील यांना आपला मुलगा आमदार होत नाही याचे टेन्शन असल्याचेही पडळकर म्हणाले.

Jayant Patil
Gopichand Padalkar : जरांगेंना सत्तास्थापनेपूर्वी पडळकरांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांच्या आंदोलनाला फडणवीस...'

जयंत पाटील यांनी आपल्या मुलग्याला आमदार करण्यासाठी जत तालुक्यात फिल्डींग लावली, चाचपणी केली. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात देखील डोकावून पाहिलं. पण सगळीकडचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना मुलग्याला उभारता आलं नाही. आता सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची वेळ गेलीय. तर तुमची लायकी, क्षमता नाही तुमची मुलं कशी आमदार होणार असा टोलाही पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com