Gopichand Padalkar : जरांगेंना सत्तास्थापनेपूर्वी पडळकरांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांच्या आंदोलनाला फडणवीस...'

Gopichand Padalkar BJP Devendra Fadnavis Manoj Jarange Maratha reservation : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा संघर्षाच्या दिलेल्या इशाऱ्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टोलेबाजी केली आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा किती प्रभाव पडला, यावरून चर्चा सुरू आहे. जरांगेंनी मराठा आमदारांना मिळालेले, यश आमच्याच फॅक्टरमुळे मिळाल्याचा दावा केलाय.

यावर ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत चाललाच नाही, असा दावा केलाय. जरांगे अन् हाके यांच्यातील 'तू तू-मैं मैं' सुरू असतानाच, भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पुढच्या भूमिकेवर वेगळच विधान केलं आहे.

राज्यात महायुतीकडून सत्ता स्थापनेला वेग आलाय. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत बरीच ओढाताण सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत ते काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील. महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याचा तिढा देखील लवकरच सुटेल. सध्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे आहे. तसंच महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा सुरू आहे. यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी, मराठ्यांची ताकद, फॅक्टर काय असतो, ते पुढील महिन्यात दिसेल, असा इशारा देत लढा तीव्र करणार असल्याचे संकेत दिलेत.

Gopichand Padalkar
Congress News : ही कामगिरी नीचांकी; काँग्रेसचे तब्बल 'एवढ्या' जिल्ह्यात एकही आमदार नाही

मनोज जरांगे यांनी हे संकेत दिले असतानाच, भाजप (BJP) नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर देखील टीका करताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच आपल्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे म्हटले आहे.

Gopichand Padalkar
Monika Rajale : जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते आमदार; आता मंत्रीपदाचे वेध?

गोपीचंद पडळकर यांनी सर्व ओबीसी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहिलेले या निवडणुकीत पाहायला मिळाले. तसेच ओबीसीबरोबर राज्यातील सर्व मराठा समाज फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केल्यास, त्याला देवेंद्र फडणवीस पुरून उरतील, असा टोला लगावला. याशिवाय देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असेही पडळकर यांनी म्हटले.

पवारांना डिवचलं

'शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी एका वाहनात बसतील, तेवढे देखील लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात निवडून आलेले नाहीत. शरद पवार आता मोठे नेते राहिलेले नाहीत. रोहित पवार फार कमी फरकाने निवडून आलेत, यातच त्यांचा पराभव झालेला आहे. रोहित पवारांनी महाराष्ट्रात घाण केली', अशी देखील टीका पडळकर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com