NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ दिली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून जयंत पाटील हे जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार हे सत्तेच्या वाटेवर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार का? अशा चर्चा सुरू आहेत.
सुनिल शेळके म्हणाले, 'रोहित पवारांवर त्यांच्या मतदारसंघातील लोकं समाधानी नाहीत. ते पक्षात कुरघोड्या करताना दिसत आहेत. त्यामुळे काही नेते मंडळी त्यांच्यावर नाराज आहेत. रोहितदादा हे कधीही सत्तेत सामील होतीस. त्यांची सत्तेकडे ओढ आहे. हिंदुत्त्वाकडे ओढ आहे. ते आम्हाला स्पष्टपणे दिसतंय.'
'रोहितदादा आमचे चांगले मित्र आहेत. ते आमच्या पक्षात आले तर ते आमच्या नेत्यांना मान्य झाले पाहिजे. तिकडेच उद्योग आमच्याकडे सुरू व्हायला नको. निष्ठेपेक्षा सत्तेची भूक लागली आहे ते सत्तेत येण्याच्या मार्गावर आहेत. ' , असे देखील सुनिल शेळके म्हणाले आहेत.
रोहित पवार यांनी सोमवारी (ता.3) माध्यमांशी बोलताना पक्षांतर्गंत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'सात वर्षे पक्षासाठी लढताना मी पक्षात कुठे तरी असू असं आमच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं आहे. पक्षामध्ये मोठा निर्णय होणार असावा, म्हणून आपला निर्णय मागे ठेवला असावा, पण फक्त आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय मी जनतेसाठी लढतच राहिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.