Sharad Pawar NCP: शरद पवार पुन्हा मैदानात; फडणवीस सरकारला आपली ताकद दाखवणार; घेतला 'हा' मोठा निर्णय

Sharad Pawar Vs Mahayuti Government : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस,उद्धव ठाकरे,आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्षांमध्ये शांतता आहे. एकीकडे महायुतीतील भाजपसह इतर मित्रपक्षांनीही 'स्थानिक'जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवारांसह काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेला होता.पण या निवडणुकीत अजित पवारांनी जोरदार मुसंडी मारत 41 तर शरद पवारांच्या 10 जागा निवडून आल्या. विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा कामाला लागले असून आता त्यांनी महायुती सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे.

महायुती सरकार (Mahayuti Government) सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि प्रशासकीय विभागांकडून 100 दिवसांचा रोडमॅप मागितला होता.आता त्यांनी या सर्व विभागांच्या कामकाजाचा त्याप्रमाणे आढावाही घेतला आहे.याचदरम्यान,आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत शुक्रवारी (ता.28) महत्त्वाची बैठक बोलावली आहे.त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणी,बदल,यांसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या महत्त्वाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 'शॅडो कॅबिनेट'ची स्थापना करण्यात आली आहे.हे कॅबिनेट राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहे.शरद पवारांनी पक्षाच्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपवली आहे. तसेच या नेत्यांना महाराष्ट्र पाया खालून घालण्याचे आदेश दिले आहेत.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Swargate Rape Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, कोर्टाकडून पोलिसांची मोठी मागणी मान्य, आरोपी दत्ता गाडेला दणका

मुंबईत झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. शरद पवारांनी या बैठकीत पक्षवाढीसाठी महत्त्वाची पावले उचलतानाच काही प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. यामध्ये रोहित पवार,राजेश टोपे,एकनाथ खडसे,हर्षवर्धन पाटील,जितेंद्र आव्हाड,शशिकांत शिंदे,जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस,उद्धव ठाकरे,आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्षांमध्ये शांतता आहे. एकीकडे महायुतीतील भाजपसह इतर मित्रपक्षांनीही 'स्थानिक'जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Maharashtra : मराठी भाषा गौरवदिनाच्या दुसऱ्याच दिवशी धक्का; 17 हजार 500 शाळांना कुलूप?

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आपल्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या बैठकीत जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा मास्टर प्लॅनही आखण्यात आला आहे. सगळी रिक्त पदं भरली जाणार आहेत. गरज वाटत असेल तर पदाधिकारीही बदलले जाणार आहे.

शरद पवारांनी या बैठकीत पक्षाच्या नेतेमंडळी,पदाधिकारी,कार्यकर्ते यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढच्या तीन महिन्यांत महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही शरद पवारांनी यावेळी दिले आहेत.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Shivsena News: इम्तियाज जलील यांचा 'तो' सल्ला ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या शिंदे अन् त्यांच्या शिलेदारांच्या पचनी पडणार का..?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com