
Sangli News : संतोष देशमुख हत्येप्रकरणात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी उडी घेत थेट धनंजय मुंडेंना निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देत त्यांची पाठराखणही केली.या त्यांच्या भूमिकेनंतर राजकीय नेतेमंडळींकडून शास्त्रींवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही महंतांवर हल्लाबोल केला आहे.
महायुतीतील आक्रमक नेते व विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठवली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) 100 टक्के गुन्हेगार नाही. इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रात संत झाला असता, असं नामदेव शास्त्री म्हणत आहेत. भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी। संत तुकोबांची ही वाणी गावगाड्याला बळ देऊन जाई.पण आता इंडियावादी संत जन्मले,वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले”, असा टोला खोत यांनी शास्त्रींना लगावला आहे.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी महंत नामदेव शास्त्रींना खडा सवाल केला आहे.ते म्हणाले,संत तुकोबा अमूक अमूक एका समाजाचे संत आहेत,संत जनाबाई अमूक अमूक समाजाच्या संत होत्या,असं कधी ऐकलं नाही.आणि या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या.पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्ह्याचा वाल्मिकी करून गेले,अशी टीका करतानाच त्यांनी काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा अशी विचारणाही केली आहे.
याचदरम्यान,विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी नामदेव शास्त्रींना खडेबोल सुनावतानाच कायद्यातून जे निष्पन्न होईल,दोषी आहे नाही हे न्यायालय ठरवेल,अशा शब्दांत कानउघडणीही केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबतच्या कनेक्शनमुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.त्यांनी अशा परिस्थितीत भगवान गडावर जात महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली.यावेळी महंतांनी मुंडेंचं समर्थन केलं होतं.
खोत म्हणाले,गुन्हेगार हा गुन्हेगार असतो.त्याला जातधर्म नसते.पाकीटमार करणाऱ्याला मारझोड होत असते. नाही केली तर आज पाकिट मारलं, उद्या तो दरोडा घालणार,असं सांगतानाच साधू संतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा दांभिकपणा आहे.आरोपींची काय मानसिकता तपासायला हवी होती? मला वाटतं या महंतांचं दर्शन घेतलं पाहिजे,असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
धनंजय मुंडे 53 दिवसापासून प्रचंड त्रास सहन करत आहेत.खंडणीवर जगणारे मुंडे नाहीत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही, गोपीनाथ मुंडे यांचा तो पुतण्या आहे.त्यांचे मित्र राजकारणात आहे.ते गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि भगवानगड त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. पक्षाच्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे, असे नामदेव शास्त्री महाराज यांनी यावेळी सांगितले. याचवेळी त्यांनी आमच्या क्षेत्रात तुम्ही इतका त्रास सहन केला असता तर मोठे संत झाले असता. एखाद्या माणसाने किती सहन करावे? असा सवाल नामदेव शास्त्री महाराज यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.