Vijaykumar Deshmukh : चंद्रकांतदादांसमोरच विजयकुमार देशमुख चांगलेच भडकले, 'डीपीडीसी' बैठकीतील वातावरण तापल्यानंतर पाटील म्हणाले...

Solapur DPDC Meeting : विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्यानं बैठकीतील गरम तापलं झालं होतं.
chandrakant patil vijaykumar deshmukh
chandrakant patil vijaykumar deshmukhsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ( 4 ऑगस्ट ) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख चांगलेच संतप्त झाल्याच पाहायला मिळाले. "दादा काम करण्याची इच्छा असलेले अधिकारी सोलापूरला द्या. पाच-पाच वर्षे अधिकारी नुसते खुर्चीत बसले आहेत. या अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छा नाही," अशी तक्रार विजयकुमार देशमुख यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.

विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्यानं बैठकीतील वातावरण तापलं झालं होतं. आमदार देशमुख ( Vijaykumar Deshmukh ) यांच्या मागणीवर बैठकीतील काही सदस्यांनी बाके वाजवून दादा दिली. यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे चेहरे मात्र पडले होते.

या बैठकीला खासजार ओमप्रकाश राजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ), जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे आमदार, माजी आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरूवातीलाच महावितरणच्या डीपीचा विषय निघाला. या विषयाची माहिती देताना अधिकारी कमी पडले. त्यानंतर महापालिकेच्या अख्यारित्यातील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सोलापुरात स्थापन झालेल्या दोन रूग्णालयाचा विषय निघाला. या विषयातही अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. त्यानंतर रमाई आवास योजनेतून सोलापुरातील लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांचं काम ठप्प झालं आहे. हे काम का ठप्प झालं? याचीही माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही.

chandrakant patil vijaykumar deshmukh
Video Yashwant Mane : आमदार यशवंत माने आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चंद्रकांतदादांसमोर जोरदार राडा; एकेरी उल्लेख अन्...

प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून रक्कम मिळत नाही, असे मुद्दे उपस्थित झाले. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. यावर आमदार देशमुख चांगलेच भडकले.

"अधिकाऱ्यांनी बैठकीला येतानाच माहिती घेऊन यायला हवे. हे असले अधिकारी काहीही कामाचे नाहीत. दादा सर्वसामान्यांना प्रश्नांबद्दल आस्था असणारे आणि काम करण्याची इच्छा असलेले चांगले अधिकारी सोलापूरला द्या. पाच-पाच वर्षे अधिकारी नुसते खुर्चीत बसले आहेत. आरोग्य, आवास योजनेसाठी गायरानचा प्रश्न यासह सामान्यांच्या योजनांची स्थिती वाईट आहे. या अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नसते, माहिती घेतो, माहिती घेऊन सांगतो, असं सांगून वेळ मारून नेत आहेत. या अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छा नाही," असं म्हणत विजयकुमार देशमुख संतापल्याचे पाहायला मिळाले.

chandrakant patil vijaykumar deshmukh
Rajan Patil : अजितदादांचे माजी आमदार राजन पाटलांचं थेट सुशीलकुमार शिंदेंना आवाहन; म्हणाले, दिलीप मानेंना...

यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "तुम्ही म्हणता एवढं सोप्प असते, तर मी अधिकाऱ्यांना आताच काढले असते. पण, हे एवढं सोप्प नाही. या अधिकाऱ्यांना घेऊनच आपल्याला काम करावे लागते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com