Mangalvedha Politic's : भाजप नगरसेवकाच्या ‘व्हॉट्‌स ॲप’वर सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाचे स्टेट्‌स; पक्षाने दिलेल्या पदाचा उल्लेखही टाळला

Ajit Jagtap News : मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे आणि पाच नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर एका भाजप नगरसेवकाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले स्टेटस चर्चेत आले आहे. या स्टेटसमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Jagtap
Ajit Jagtap Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mangalvedha, 19 October : मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष सुनंदा अवताडे यांच्यासह पाच नगरसेवकांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भाजप नगरसेवकाने ठेवलेल्या स्टेटसची चर्चा रंगू लागली आहे.

मंगळवेढा नगरपालिकेच्या ११ महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित जगताप यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. मात्र, पक्षीय पातळीवर स्थानिक आमदार ज्या पक्षाचा त्याच पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशी रणनीती महायुतीमध्ये ठरली होती. त्यामुळे अजित जगताप यांच्या पत्नीने भाजपत प्रवेश करून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या 212 मतांनी निसटता पराभव झाला होता.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी अजित जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पण, निकालानंतर नगरपालिका निवडणुकीतील अनेक घडामोडी बाहेर येऊ लागल्याने अजित जगताप हे अस्वस्थ होते. मात्र, त्यांनी याबाबत उघड कोणतीही भूमिका घेतली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करतानाचे ठेवलेले व्हॉट्स अप स्टेटस मात्र बऱ्याच गोष्टी सांगून जाते.

तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चार वर्षांपूर्वी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याला यश मिळाले मिळाले होते, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आघाडी होईल, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, निवडणूक पक्षीय चिन्हावर झाल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

Ajit Jagtap
Uday Samant : शिवसेना नेत्याचा जयकुमार गोरेंना इशारा : ‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’

दरम्यान, जगताप यांनी ठेवलेल्या ‘स्टेट्‌स’ वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याशिवाय इतर कोणत्याही पक्षनेत्याचा फोटो नाही. शिवाय स्वतःकडे असलेल्या नगरसेवकपदाचाही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी काय घडामोडी घडतात, याविषयी शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राजकीय नेते हे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, त्यानंतर कोणतीही निवडणूक नाही. फक्त आठ महिन्यांनंतर दामाजी कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जगताप यांचे स्टेटस नव्या राजकीय समीकरणाचे संकेत देत आहे.

Ajit Jagtap
Satej Patil Appeal : सतेज पाटलांची ‘ती’ भावनिक साद ठरली निवडणुकीचा टर्निंग पॉईंट : 2 मंत्री, 2 खासदार अन्‌ 10 आमदारांना दिला धोबीपछाड

मी भाजप प्रवेश केलेला नाही : अजित जगताप

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या स्टेट्‌सबाबत अजित जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा मी पदाधिकारी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही. शिवाय भाजपत प्रवेशही केलेला नाही, त्यामुळे माझ्या पक्षनेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यात गैर काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com