निवडणूक तोंडावर असताना बदलाची काय गरज होती : पदाधिकारी बदलावर सभापतींचा नाराजीचा सूर

भाजपचे पदाधिकारी राजीनाम्यास तयार; पण सहयोगींची नाराजी!
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत प्रदेश नेते आणि जिल्हा कोअर कमिटी नेत्यांनी आदेश दिल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. सहयोगी रयत आघाडी, घोरपडे समर्थकांचा अद्याप निर्णय झालेला नाही. उद्या (ता. २५ ऑक्टोबर) पाचपैकी किती सभापती आपला राजीनामा देतात, याकडे लक्ष असेल. (BJP office bearers in Sangli Zilla Parishad ready to resign)

कोरोना संकटामुळे दीड वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषदेत चांगला निधी उपलब्ध झाला आहे. आता कुठे विकासाला गती देता येईल, असे वाटत असताना आणि निवडणुकीला काही महिनेच बाकी असताना बदल करायची गरज होती का, असा नाराजीचा सूर काही सभापतींनी आपल्या नेत्यांकडे आळवला आहे. त्यांनी नाराज होण्यापेक्षा इतरांना संधी मिळतेय, यात आनंद मानावा, असा सूर बदलासाठी आग्रही गटाने आळवला आहे.

भाजप कोअर कमिटीने राजीनामा देण्याचा आदेश जारी केला असल्याने उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती सुनिता पवार आणि खासदार पाटील यांचे समर्थक प्रमोद शेंडगे राजीनामा देतील, असे सांगण्यात येत आहे. रयत विकास आघाडीचे जगन्नाथ माळी यांचे नेते असलेले सम्राट महाडिक भाजप कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे माळी यांच्याबद्दल अडचण असणार नाही. घोरपडे समर्थक आशा पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. नेत्यांनी आदेश दिल्यास आम्ही तत्काळ अंमल करू, अशी त्यांची भूमिका आहे. शिवाय, आता बदल झाल्यास घोरपडे समर्थक अन्य सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

BJP
समीर वानखेडेंवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करा : मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

बदलास ना-ना म्हणत नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. उपाध्यक्ष आणि सभापती निवडीत भाजप आणि सहयोगी यांचे मेतकूट कसे जुळवून आणले जाते, हे महत्वाचे असेल. सहयोगी पक्षाच्या नेते आपल्या गटातील उर्वरीत सदस्यांना पद देण्याची संधी साधण्याच्या तयारीत आहेत. या गटातील अन्य सदस्य इच्छुक म्हणून पुढे सरसावू लागले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदासाठीच्या नव्या नावांची चाचपणी सुरु झाली आहे. आरग येथील सदस्य सरिता कोरबू यांचे नाव अध्यक्षपदासाठी जवळपास निश्‍चित मानले जात आहे. त्यांना शब्द दिला होता आणि तो पाळला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत खासदार संजय पाटील यांनी हा बदल घडवून आणला. उपाध्यक्षपदासाठी डी. के. पाटील, संपतराव देशमुख या दोन ज्येष्ठांचा विचार केला जाऊ शकतो.

BJP
मला चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्याचा धोका : समीर वानखेडेंचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

भाजपचे नेते जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल. अद्याप कोणताही थेट निरोप माझ्यापर्यंत आलेला नाही. राजीनामा देण्याचे आदेश आले की त्यानुसार कार्यवाही करू. आमची पक्षाशी निष्ठा आहे. पदापेक्षा पक्ष मोठा आहे, असे सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी सांगितले.

आमचे नेते अजितराव घोरपडे जो आदेश देतील त्याचे पालन करू. त्यांच्याकडून अद्याप कसलाही निरोप आलेला नाही. त्यामुळे राजीनामा किंवा अन्य काय धोरण याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे सभापती आशा पाटील म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com