समीर वानखेडेंवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करा : मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करणे आणि खंडणी मागणे या प्रकरणात फिर्याद नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. किरण गोसावी याच्या बॉडीगार्डने आज (ता. २४ ऑक्टोबर) सकाळी क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरूख खानच्या मॅनेजरकडून ५० लाख रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर सायंकाळी ॲड कनिष्क जयंत यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (File a case of ransom and kidnapping against Sameer Wankhede : Letter to Mumbai Police Commissioner)

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना ॲड कनिष्क जयंत यांनी या मागणी संदर्भातील पत्र लिहिले आहे. त्या पत्रात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या सहा जणांवर शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करणे आणि खंडणी मागणे या प्रकरणात फिर्याद नोंदवण्याची मागणी पोलिस आयक्त नगराळे यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

Sameer Wankhede
आरोप फेटाळले, मात्र प्रभाकरचे अॅफिडेविट एनसीबीच्या महासंचालकांना पाठवणार

प्रभाकर साईलचा गौप्यस्फोट

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने आज सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीकडे दुपारी पत्रक काढून खुलासा करण्यात आला होता. वानखेडे यांनी कार्डिलिया क्रूझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली होती. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव होतं.

Sameer Wankhede
केंद्रातील भाजप सरकार ब्लॅकमेलर; अधिकाऱ्यांना तोडपणी करायला सांगते

समीर वानखेडेंचे पोलिस आयुक्तांना पत्र

समीर वानखेडे यांनी रविवारी (ता. २४ ऑक्टोबर) सायंकाळी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहेत. त्यात वानखेडे यांनी म्हटले आहे की, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, कारण, हे प्रकरण आता माझ्या वरिष्ठांकडे सोपविण्यात आलेले आहे. मला तुरुंगात टाकण्याचा आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत, असे सांगून त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

पत्रात वानखोडे यांनी पुढे म्हटले आहे की, हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये. मुंबई पोलिस आयुक्तांबरोबरच ह्या पत्राची कॉपी पोलिस महासंचालकांनाही देण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com