Medha Kulkarni : पुरोहित अन् 'मंत्रां'ची चेष्टा करणाऱ्या मिटकरींसोबत स्टेजवर बसले नाही; मेधा कुलकर्णींनी सांगितला 'तो' किस्सा

Medha Kulkarni News : ब्राह्मण समाजावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका आणि नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा, असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केलं.
Amol Mitkari | Medha Kulkarni
Amol Mitkari | Medha Kulkarnisarkarnama

Sangli News, 1 June : आपले पुरोहित आणि मंत्रांची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरी यांच्यासोबत मी स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा घेतल्याचा किस्सा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितला आहे.

देशाला पुढे नेण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे, असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे. त्या सांगलीत बोलत होत्या.

"आपले पुरोहित आणि मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत स्टेजवर बसणार नाही. असा पवित्रा आपण अमोल मिटकरी यांच्याबाबत बारामतीमधील एका सभेत घेतला होता. यानंतर मिटकरी सभेला आलेच नाही. त्यामुळे जे चुकीचे आहे, त्याला चूक म्हणा," असं मेधा कुलकर्णी ( Medha Kulkarni ) यांनी म्हटलं.

"देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया," असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

Amol Mitkari | Medha Kulkarni
Ravindra Dhangekar: खबर पक्की, विजय नक्की; धंगेकर समर्थकांचे सेलिब्रेशन

"ब्राह्मण समाज चुकत असेल, तर जरूर ऐकून घ्या. त्यात दुरूस्ती करा. पण, विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला, तर सोडायचं नाही. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका आणि नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा," असंही मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.

Amol Mitkari | Medha Kulkarni
Sanjog Waghere Vs Srirang Barne : बारणे, वाघेरेंचे लाखाच्या मताधिक्यांचे दावे फोल ठरणार; घाटाखालचे मतदान ठरणार निर्णायक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com