Kolhapur News : कोल्हापूर महापौर पदाची निवडणूक आज पार पडली. काँग्रेसने उमेदवार देऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप उमेदवार रुपाराणी निकम यांनी सहज विजय मिळवत महापौर पदी विराजमान झाल्या. तर, उप महापौर म्हणून जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग विजयी झाले.
महायुतीच्या उमेदवार रुपाराणी निकम आणि उप महापौर जरग यांना प्रत्येकी 46 मते मिळाली तर तर काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार सचिन शेंडे तसेच उपमहापौर पदाचे उमेदवार दुर्वास कदम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवारांना 35 मते मिळाली. पिठासन अधिकारी आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 34 नगरसेवक आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडे एक नगरसेवक आहे. त्यामुळे त्यांचे संख्याबळ 35 आहे. तर, महायुतीमध्ये भाजपमध्ये सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे 26 नगरसेवक विजयी झाले होते. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि जनसुराज्यचा एक असे त्यांचे संख्याबळ 46 होते.
काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. भाजप महायुतीची निवडणुकीत सरशी झाली होती. भाजपच्या रुपाराणी या महापौर म्हणून विजयी झाल्या आहेत. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे असणार आहे. त्यामुळे सतेज पाटील कोणाल संधी देतात याची उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.