

नगरपालिका निवडणुकांत भाजपला करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळसह अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे.
मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे, करमाळ्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत आणि मंगळवेढ्यात सुनंदा आवताडे विजयी झाल्या आहेत.
अनेक ठिकाणी भाजपविरोधी उमेदवार आघाडीवर असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Solapur, 21 December : नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भारतीय जनता पक्षाला अनेक महत्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागत आहे. करमाळा, मंगळवेढा, मोहोळमध्ये भाजप विरोधातील उमेदवार विजयी झाले आहेत. करमाळ्यात सावंत गटाच्या शहर विकास आघाडीचे, मोहोळमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या १७० मतांनी विजयी झाल्या आहेत. करमाळ्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत, तर मंगळवेढ्यातून सुनंदा आवताडे विजयी विजयी झाल्या आहेत, त्यामुळे सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
सांगोला, पंढरपूर, अकलूज, कुर्डूवाडी या ठिकाणी भाजपला धक्का देत विरोधकांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी येथील आघाडी घेतली आहे, त्यामुळे सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. त्यात सर्वच जागांवर भाजपने आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते. अनेक ठिकाणी तोडफोड करून पालकमंत्री गोरे यांनी भाजपचे उमेदवार दिले होते, ते जनतेला आवडलेले दिसत नाही.
सांगोल्यात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे गटाचे आनंद माने आघाडीवर आहेत. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके, अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, तर कुर्डूवाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
भाजपला सर्वाधिक फटका कुठे बसला? – करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला.
मोहोळमध्ये कोण विजयी झाले? – शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे १७० मतांनी विजयी झाल्या.
भाजप कुठे आघाडीवर आहे? – बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी येथे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पराभवामागचे मुख्य कारण काय मानले जात आहे? – उमेदवार निवडीत झालेली तोडफोड आणि जनतेची नाराजी हे प्रमुख कारण मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.