Solapur Politic's : भाजपने अखेर डाव साधलाच; सोलापुरात नगरपरिषदेसाठी स्वबळाची घोषणा, शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी

Municipal Council Election 2025 : सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे. या घोषणेने महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis-Ajit Pawar-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Ajit Pawar-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अडचण वाढली आहे.

  2. पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली, तर उमेदवारी निवडताना तरुण आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.

  3. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत निवडणूक धोरण ठरले, तर महायुती काही ठिकाणी शक्य असल्याचे संकेतही दिले गेले.

Solapur, 06 November : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा नगरपरिषदांचा होत असून त्यासाठीची आचारसंहिताही जाहीर झाली आहे. राजकीय पक्षांनीही जय्यत तयारी केली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील भारतीय जनता पक्षाची वाटचाल स्वबळावर निवडणुका लढविण्याकडे होताना दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची निवडणूक भाजपने स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या स्वबळाच्या घोषणेने महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

याबाबत भाजपचे सोलापूर जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी निर्णय जाहीर केला आहे. याबाबत पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येतील. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने स्थानिक नेत्यांना दिला आहे. त्यानुसार आपण प्रदेशाला त्याची कल्पना दिली आहे.

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी पक्षाने ए-बी फॉर्म दिल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, अन्य पक्षांमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करत आहेत, त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. विशेषतः तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. उमेदवार निवडताना जुन्यांसह नवे नेते - कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाणार आहे. तसेच, निवडून येण्यास सक्षम उमेदवाराचा विचार केला जाणार आहे.

प्रदेशाध्यक्षांशी चर्चा....

जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, कार्यालय समन्वयक सुधीर देऊळगावकर, सरचिटणीस तथा आमदार विक्रम पाटील, राजेश पांडे यांची भेट घेऊन नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी केवळ निवडणुकीबाबत चर्चा झाली असून माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis-Ajit Pawar-Eknath Shinde
Bhimrao Dhonde News : आष्टीत लक्ष घालणार म्हणताच, पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार भीमराव धोंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर!

दरम्यान, भाजपचे पश्‍चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही जिल्ह्यातील पश्चिम विभागातील नगरपरिषदांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले. पश्चिम भागातील पाचही नगरपालिका क्षेत्रात भाजपची मोठी ताकद आहे. तसेच, इतर पक्षांतील अनेक नेते-कार्यकर्तेही भाजपत आले आहेत, त्यामुळे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

प्रदेश पातळीवरून देण्यात येणाऱ्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात येईल, असे केदार यांनी सांगताना ज्या ठिकाणी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद आहे, त्या ठिकाणी महायुतीही होऊ शकते. पण सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी नगरपरिषदेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, हे स्पष्ट आहे.

Devendra Fadnavis-Ajit Pawar-Eknath Shinde
Kokan Politics : शिवसेनेनं ऐनवेळी नकार दिलाच तर राष्ट्रवादीचा बॅकअप प्लॅन; तटकरे योगेश कदमांना दाखवणार 'राजकीय कॅल्क्युलेशन'?

राष्ट्रवादी-शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची कोंडी होणार आहे.

Q1. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका भाजप कशा पद्धतीने लढवणार आहे?
A1. भाजपने या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Q2. उमेदवार निवडताना कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे?
A2. तरुण आणि नव्या चेहऱ्यांना तसेच जिंकण्यास सक्षम उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Q3. हा निर्णय कोणत्या नेत्यांनी जाहीर केला?
A3. सोलापूर पूर्व विभागाचे शशिकांत चव्हाण आणि पश्चिम विभागाचे चेतनसिंह केदार यांनी जाहीर केला.

Q4. या निर्णयाचा महायुतीवर काय परिणाम होईल?
A4. भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com