
Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे. तगडे नेते, उमेदवार पक्षात घेण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपकडून (BJP) रणनीती आखली जात आहे. त्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पण भाजपकडून आतापासूनच स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. पण मित्र पक्षासोबत दबाव राहण्यासाठी ३३ जागांच्यापुढे बोलणी सुरू ठेवणार असेच जाहीर केल्याने महायुतीतील जागा वाटपाची स्पर्धेत आतापासूनच चुरस निर्माण केली आहे.
मागील कोल्हापूर (Kolhapur) महापालिका सभागृहात भाजपचे 14, ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक होते. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत 33 जागांवर आमचेच उमेदवार असतील. उर्वरित जागांमध्येच महायुतीचे जागावाटप होईल, असा सूर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकड्न आवळला जात आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच मित्र पक्षांवरील दबाव वाढवण्याचे प्रयत्न भाजपचे दिसत आहेत.
चार सदस्य प्रभाग रचनेनुसार कोल्हापूर महानगरपालिकेत केवळ 22 मतदार संघ होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा त्या बारा ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर या सर्व प्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे.
सध्या कोल्हापूर जिल्हा पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा झाली असली तरी भाजपकडून जागा वाटपात जवळपास 40 टक्क्यांचा वाटा गृहीतच धरला असल्याची चर्चा खाजगीत सुरू आहे.
महायुतीतील पक्षातील गणित पाहिले तर शिवसेनेचे मागील सभागृहातील संख्याबळ पाहता शिवसेनेचे चार, राष्ट्रवादीचे 14, भाजपचे 14 तर ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक होते. सध्या ताराराणी आघाडी भाजपमध्ये विलीन झाले आहे.
तर त्यातील काही प्रमुख पदाधिकारी हे शिंदेचे शिवसेनेत दाखल झाले आहेत. अशातच भाजप म्हणून लढत असताना जागा वाटपाचे केवळ शिवसेनेची स्पर्धा भाजपसोबत आहे. त्यावरच राजकारणाचे गणित अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.