
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले असतानाच याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील महानगरपलिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका टप्प्याटप्याने होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. त्यासोबतच हा निवडणुकीचा बार दिवाळीनंतरच उडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली असून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे.
राज्यातील स्थानिकाच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षाने तयारी सुरु केली आहे. विशेषतः सुप्रीम कोर्टाने सोमवारीच ओबीसी आरक्षनानुसार व २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असल्याचे स केले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नुकताच निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी दिनेश वाघमारे यांनी राज्यातील महानगरपलिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका टप्प्याटप्याने होणार असल्याचे सांगितले. मनुष्यबळ व यंत्रणा अपुरी असल्याने सर्व निवडणुका एकत्रित घेणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच या निवडणुकीसाठीचे मतदान व्हीव्हीपॅटशिवाय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एससी आणि एसटी आरक्षण निश्चित असते, परंतु ओबीसी (Obc)आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "मागील निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्त्व पाळले जाणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मतदार यादी आणि प्रभाग रचनेवर काम सुरू झाले असून 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.