

Satara, 13 November : नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर म्हावशी (ता. खंडाळा) येथील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकीकडे कारखाना बिनविरोधचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे एक गट निवडणुकीसाठी आग्रही होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी पाच जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपमध्ये एकवाक्यता न राहिल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भाजपने आपले सर्वच उमेदवार मागे घेतले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सर्व २१ उमेदवार हे बिनविरोध निवडले गेले आहेत.
खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असताना एक गट निवडणुकीसाठी आग्रही होता. मात्र, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी टाकलेल्या डावात भाजप नेते चारीमुंड्या चीत झाले.
बिनविरोधसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जागांचा प्रस्ताव मिळाल्यानंतर भाजपमध्ये एकवाक्यता राहिली नाही. भाजप नेते शंकरराव गाढवे, अनिरुद्ध गाढवे, हृषीकेश धायगुडे, बापूराव धायगुडे आणि अतुल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता तज्ज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार तज्ज्ञ संचालकपदी मंत्री मकरंद पाटील आणि लेखापरीक्षक प्रवीण गाढवे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
खंडाळा शेतकरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ संचालक पुढीलप्रमाणे
खंडाळा गट : चंद्रकांत मारुतराव ढमाळ, शिवाजी सदाशिव खंडागळे, दत्तात्रय नारायण ढमाळ
शिरवळ गट : राजेंद्र ऊर्फ अनंत पांडुरंग तांबे, रामदास महादेव तळेकर, प्रवीण सदाशिव जाधव
बावडा गट : विश्वनाथ गोविंद पवार, रमेश नारायण धायगुडे, मनोज फुलचंद यादव
भादे गट : मयूर शिवाजी जगताप, ज्ञानेश्वर मुकुटराव भोसले, राजेंद्र रामचंद्र कदम
लोणंद गट : धनाजी गुलाबराव अहिरेकर, शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील, नानासाहेब बाळकृष्ण ननावरे
ब वर्ग प्रतिनिधी : डॉ. अनिलराजे अनंतराव निंबाळकर
अनुसूचित जाती व जमाती प्रतिनिधी : रत्नाकांत आनंदराव भोसले
महिला राखीव प्रतिनिधी : श्यामल धनंजय नेवसे, रंजना भाऊसाहेब धायगुडे
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : नितीन काशिनाथ ओव्हाळ
भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी : बाळासाहेब पांडुरंग शेळके
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.