भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार : रोहित पवारांवर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

भाजप ( BJP ) प्रदेशचे कार्यालय सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
राम शिंदे, रोहित पवार

राम शिंदे, रोहित पवार

सरकारनामा

Published on: 
Updated on: 

अहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणुकीचे उद्या ( मंगळवारी ) मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवारांवर दबाब तंत्र वापरून उमेदवार पळविले, अशी तक्रार भाजप ( BJP ) प्रदेशचे कार्यालय सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीत आमदार रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. BJP's complaint to Election Commission: File a case against Rohit Pawar for violating code of conduct

मिलिंद कुलकर्णी यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु. पी. एस. मदान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आमदार रोहित पवार यांच्याकडून सत्तेच्या बळावर दबावतंत्राचा वापर करुन होत असलेल्या गैरप्रकाराबाबत. कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार शिबा तारेक सय्यद यांची प्रभाग क्रमांक 14मधील प्रचारसभा प्रा. राम शिंदे, भाजपा नेते व माजी मंत्री आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी 17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता घेतली होती आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता शिबा सय्यद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

<div class="paragraphs"><p>राम शिंदे, रोहित पवार</p></div>
सुजय विखे पाटलांनी रोहित पवार, नीलेश लंकेंना मारला टोमणा, म्हणाले...

कर्जत नगरपंचायत मतदार संघात निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या उमेदवारांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभावित करुन उमेदवारी मागे घेण्याबाबत स्थानिक आमदार रोहित पवार यांनी जबरदस्तीने व सतेचा दबाव टाकून बळी पाडले आहे. ही बाब निंदनीय आहे. निवडणुकीत राजकीय दबावतंत्राचा वापर करुन व दहशत निर्माण करुन भाजपच्या उमेदवारांना संभ्रमित करण्याचा डाव आमदार रोहित पवार यांनी आखला आहे.

<div class="paragraphs"><p>राम शिंदे, रोहित पवार</p></div>
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्याकडून नगरपंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांना प्रलोभन दाखवून जबरदस्तीने पक्षांतर करण्यास भाग पाडणे, सत्तेचा दबाव टाकून मतदारसंघात दहशत निर्माण करणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा उघड-उघड भंग झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता व असे प्रकार प्रत्यक्षदर्शनी उघड झाले असल्याने वार्ड - कर्जत नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.