BJP Lok Sabha Performance : भाजपची लोकसभा निवडणुकीत 20 कारणांमुळे खराब कामगिरी ; धनंजय महाडिक...

Dhananjay Mahadik : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत अत्यंत विषारी पद्धतीने प्रचार केला. स्थानिकसह इतर कारणेही लोकसभा निवडणुकीतील अपयशाला आहेत.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 June : मराठा आरक्षण, संविधान बदलण्याचा चुकीचा प्रचार, कांदा निर्यातबंदीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे अशा प्रकारच्या वीस कारणांचा भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला, असा युक्तिवाद खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला महाराष्ट्रात कमी जागा मिळण्याच्या संदर्भात केला.

सोलापूर (Solapur) लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पराभवाचे कारणे शोधणे आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाडिक यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या कमी जागा येण्यामागची कारणे स्पष्ट केली.

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत अत्यंत विषारी पद्धतीने प्रचार केला. स्थानिकसह इतर कारणेही लोकसभा निवडणुकीतील अपयशाला आहेत. पण लोकसभा आणि विधानसभेची समीकरणे वेगवेगळी असतात, त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल.

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुमारे 28 पक्षांनी एकत्र येत जेवढ्या जागा जिंकलेल्या नाहीत, त्यापेक्षा अधिक खासदार एकट्या भाजपचे निवडून आले आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यामुळे केंद्रात पुन्हा भाजपच सत्तेवर आला आहे, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

महाडिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. सोलापूरचाही आढावा घेतला आहे, त्याचा अहवाल भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगवेगळी असतात, त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेला वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ करणाऱ्या प्रणिती शिंदे यांचाही महाडिकांनी समाचार घेतला.

Dhananjay Mahadik
Solapur BJP : सोलापूर भाजपमधील वाद पेटला; कल्याणशेट्टी, काळे, पवारांविरोधात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निरीक्षकांकडे तक्रारी

प्रणिती शिंदेंना टोला

दुसऱ्याला वाईट बोलून लोकप्रियता मिळविता येत नाही. त्यातून स्वतःचा दर्जा दिसून येतो. वरिष्ठ नेत्यांविषयी अशा प्रकारचे विधान करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी देऊन कामे होत नसतात, असा टोलाही शिंदे यांना महाडिकांना लगावला.

‘भीमा’च्या संचालकांना पाठीशी घातले

खासदार धनंजय महाडिक प्रमुख असलेल्या भीमा कारखान्याच्या संचालकांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन भाजपविरोधात प्रचार केला. त्यावर पांघरून घालत स्थानिक स्तरावरचे विषय हे वेगळे असतात, त्यामुळे भीमा कारखान्याच्या संचालकांवर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे सांगून महाडिकांनी भीमा कारखान्याच्या संचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

Dhananjay Mahadik
Solapur BJP Meeting : सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ; निरीक्षक धनंजय महाडिकांनाच विचारला कार्यकर्त्यांनी जाब!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com