Madha News : माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला कुर्डू जिल्हा परिषद गटात उजनी धरणाच्या पाण्याचा संघर्ष पेटला आहे. या गटातील तब्बल १३ गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी टेंभुर्णी-लातूर हा महामार्ग कुर्डू (ता. माढा) या ठिकाणी तब्बल तीन ते चार तास रोखून धरला, त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Block the way of citizens of thirteen villages in Madha for the water of Ujani dam)
माढा तालुक्यातील कुर्डू जिल्हा परिषद गट हा आमदार शिंदे बंधू यांचा घरचा गट म्हणून ओळखला जातो. कारण, आमदार शिंदे बंधूंच्या शब्दावर हा गट बिनविरोधदेखील होतो. मात्र, आता त्याच गटातून उजनीच्या पाण्यासाठी संषर्घाची मशाल पेटविण्यात आली आहे. आगामी काळात पाण्यासाठीचा संघर्ष अधिक आक्रमक दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कुर्डू, पिंपळ खुटे, ढवळस, पिंपरी भोगेवाडी, भोसरे, वडाचीवाडी, रणदिवेवाडी, महातपूर अशा तेरा गावांमधील नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. टेंभुर्णी-लातूर महामार्ग कुर्डू या ठिकाणी आज सकाळी तब्बल तीन ते चार तास आंदोलकांनी रोखून धरला होता. उजनी धरणातून बेंद ओढ्यात पाणी सोडावे, अशी मागणी बेंद ओढा पाणी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, बेंद ओढ्याला पाणी सुटूत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
आंदोलकांनी या वेळी तीव्र शब्दांत आपल्या भावना मांडल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आण्णा ढाणे म्हणाले की, शरद पवारांपासून, विजयसिंह मोहिते पाटील आणि शामलताई बागल यांच्यापासून नारायण पाटील आणि आमच्या पट्ट्यांपर्यंत आम्हाला फक्त आणि फक्त शब्दांमध्ये झुलवत ठेवण्यात आले आहे. सगळ्यांनी पाणी देतो असा शब्द दिला; परंतु आम्हाला पाणी मात्र कोणीही दिलं नाही.
या वेळी सर्वच पक्षातील नेत्यांनी रस्ता रोकोला हजेरी लावली होती. बेंद ओढा पाणी संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरला हलगी मोर्चा आयोजित केला आहे. त्यानंतर बेमुदत उपोषणही केले जाणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे. विधानसभा तोंडावर असताना आमदार शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यांमध्ये पाच ते सात गावांनी पुकारलेलं आंदोलन हे आक्रमक होताना दिसत आहे. हा पाणी प्रश्नाला सोडवण्यासाठी आमदार शिंदेंचा कस लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.