
Pune News : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याकांडाने अख्खा देश हादरला होता. याप्रकरणी जनरेटा वाढल्यानंतर वाल्मिक कराडला अटक झाली. तर वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आता या प्रकरणात एक आरोपी फरार असून त्यालाही लवकरात लवकर बेड्या ठोकत जेलमध्ये टाकावं अशी मागणी समस्त राज्याची आहे. यासाठी धनंजय देशमुख लढा लढत आहेत. दरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं पुण्यात देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्याने पानावलेल्या डोळ्यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. ज्याची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे.
बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 100 दिवसांपेक्षा अदिक दिवस झाले आहेत. अद्याप त्यांचा एक मारेकरी हा फरारच आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्या आरोपीच्या अटकेची मागणी करत आहेत. यासाठी ते लढा देत असून संतोष देशमुख त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.
या दरम्यान धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट अभिनेता आमिर खानने घेतली. पाणी फाऊंडेशनच्या पुण्यातील कार्यक्रमात ही भेट घेण्यात आली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख उपस्थित होता.
या भेटीचा आता व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेता आमिर खान आणि देशमुख कुटुंबीयांच्या भेटीत धनंजय देशमुखही दिसत असून त्यांनी आमिरशी चर्चा केल्याचे दिसत आहे. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.
यावेळी अमिर खानने धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांचे सांत्वन केलं. या भेटीवेळी चर्चा करताना संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यांत पाणी आले होते. तर अमिरही हळहळला होता. अमिरने संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख याला कडकडून मिठी मारल्याचे समोर येत आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. ही निर्घृणपणे करण्यात आली होती. तर ती फक्त पवनचक्कीच्या खंडणीच्या वादातून झाली होती.
या हत्येचा मुख्य सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचे समोर आले होते. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.