Ram Satpute : राम सातपुतेंना माळशिरसमध्ये उमेदवार म्हणून आणणे, ही माझी चूक ठरली : ज्येष्ठ भाजप नेत्याची कबुली

Malshiras BJP Dispute News : माळशिरस भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांनी राम सातपुते यांना उमेदवार म्हणून तालुक्यात आणणे, ही आपली चूक ठरल्याची कबुली दिल्याने अंतर्गत कलह तीव्र झाला आहे.
K. K. Patil-Ram Satpute
K. K. Patil-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on
  1. भाजपमध्ये अंतर्गत फूट – माळशिरस भाजपमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यशैलीवरून ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

  2. सातपुते यांच्यावर गंभीर आरोप – गुंड पाठवणे, धमक्या देणे, खोटी माहिती पसरवणे आणि पक्षात असंतोष पसरवण्याचे आरोप पाटील व इतर नेत्यांनी सातपुते यांच्यावर केले.

  3. भाजप कार्यकर्त्यांची एकजूट – विविध राजकीय संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सातपुते यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले.

Natepute, 15 Septemebr : विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या युतीला तोडीस तोडी टक्कर देणाऱ्या माळशिरस भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गटाने माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यशैलीवर नाराज होत सवतासुभा मांडला आहे. ‘उत्तम जानकरांच्या दाखल्याची अडचण निर्माण होते; म्हणून आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून मीच राम सातपुतेंना उमेदवार म्हणून माळशिरसमध्ये आणले. मात्र, सातपुतेंना माळशिरसमध्ये आणणे माझी चूक ठरली, अशी जाहीर कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकजूटपणे लढलेल्या भाजपमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीत काम न केल्याच्या आरोपावरून मतभेद वाढायला सुरूवात झाली होती. काही दिवसांपूर्वी माळशिरसमधील (Malshiras ) जुन्या भाजप नेत्यांनी एकत्रित येत दोन बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर के. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी माळशिरस तालुक्यातील संगम येथे एक बैठक झाली. त्यात बैठकीतच पाटील यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे.

के. के. पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यात भाजप वाढत असताना आमचे नेहमीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अडचणी निर्माण व्हायच्या, त्यामुळे मीच आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून हे उमेदवार (राम सातपुते Ram Satpute) आणले. मात्र त्याच वेळी जर जानकर यांना दाखल्याची अडचण आली तरच सातपुते यांनी संधी देण्याचे ठरले. मात्र त्यांना (सातपुते) आणणे ही माझी चूक ठरली.

विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांना मिळालेली एक लाख ०८ हजार मते ही तालुक्यातील भाजप आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती होती. आमच्या पक्षात आधी राष्ट्र, मग पक्ष व त्यानंतर मी हा मंत्र आहे. मात्र आता उलटे वाचावे लागत आहे. त्यांच्या (सातपुते) या वागण्याने तालुक्यात असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप के. के. पाटील यांनी केला.

पाटील म्हणाले, राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात चुकीचे वळण लावण्यास सुरुवात केली आहे. पोलिस पाठवणे, गुंड पाठवणे, धमक्या देणे, दोन नंबरवाल्यांना घेऊन फिरणे, हे या तालुक्यात चालणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांनी आता भाजप नेत्यांना आमच्याकडे जाऊ नका म्हणून फोन करणे, मंगल कार्यालयमालकांना फोन करणे, कार्यक्रमात गुंड लोकांना पाठवणे, असे प्रकार केले आहेत. त्यांच्या या वागण्यानेच तालुक्यातील सर्वच पक्षांचे समविचारी कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

K. K. Patil-Ram Satpute
Vanchit Politic's : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक युतीबाबत आंबेडकरांचे मोठे विधान; ‘भाजप अन्‌ त्यांचे मित्रपक्ष सोडून....’

'सोलापुरात भांडण लावून आले'

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरला गेलेले राम सातपुते परत येताना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावून आल्याचे सांगण्यात आले. ते मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचे खोटे सांगून भाजपची विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत आहेत, असा आरोपही के. के. पाटील यांनी केला.

सातपुते माळशिरस भाजप संपवायला निघालेत

राम सातपुते प्रा. लि. ही कंपनी माळशिरस तालुक्यातील भाजप संपवायला निघाली आहे. या तालुक्यातील ते वाल्मीक कराड होऊ पाहात आहेत, असा आरोप भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश इंगळे यांनी केला आहे.

बैठकीस भाजपचे राज्य तसेच जिल्हा, तालुका पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, रिपाईं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना शिंदे गट, मनसे, भारतीय दलित महासंघ, प्रहार, रयत शेतकरी संघटना आदी प्रमुख राजकीय संघटनांचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, अतुल सरतापे, पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सूळ, सत्यजित सपकाळ, बाळासाहेब धाईंजे, अजित बोरकर, शहाजी पारसे, दिगंबर मिसाळ, दादा लोखंडे आदी उपस्थित होते.

K. K. Patil-Ram Satpute
Sujat Ambedkar : ‘फडणवीस सरकारने मराठ्यांची फसवणूक केलीय; आरक्षणाचा जीआर सुप्रीम कोर्टात टिकणारच नाही’

प्र.1: माळशिरस भाजपमध्ये फूट का पडली?

उ. – राम सातपुते यांच्या कार्यशैली व वागणुकीवरून असंतोष निर्माण झाला.

प्र.2: के. के. पाटील यांनी कोणती कबुली दिली?

उ. – सातपुते यांना उमेदवार म्हणून आणणे ही माझी चूक होती, असे त्यांनी मान्य केले.

प्र.3: सातपुते यांच्यावर कोणते मुख्य आरोप झाले?

उ. – गुंड पाठवणे, धमक्या देणे, खोटी माहिती देणे आणि पक्षाची बदनामी करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com