Ram Satpute : रामभाऊ, तुम्हाला लवकरच संधी मिळणार आहे; माझं अन्‌ फडणवीसांचं... : संजय शिरसाटांचं माळशिरस दौऱ्यात मोठे विधान

Sanjay Shirsat Solapur Tour : देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राम सातपुते मिळणाऱ्या संभाव्य संधीबाबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे सातपुते यांना कोणती मिळणार, याची उत्सुकता माळशिरसमध्ये आहे.
Ram Satpute- Sanjay Shirsat
Ram Satpute- Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 August : रामभाऊ, तुम्हाला लवकरच दुसरी एक संधी मिळणार आहे, याची कल्पना मला आहे. असं समजू नका की, देवेंद्र फडणवीस फक्त तुमच्याच जवळचे आहेत, माझ्याही लय जवळचे आहेत, असे सांगून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना मिळणाऱ्या पदाबाबत संधीबाबत माळशिरसमध्येच मोठे भाष्य केले आहे.

सामजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे आज माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या दौऱ्यात दोन्ही मंत्र्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या घरी भेट दिली, त्यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना राम सातपुते यांना मिळणाऱ्या नव्या जबाबदारीबाबत शिरसाट यांनी भाष्य केले.

माजी आमदार राम सातपुते (Ram satpute) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची चर्चा होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांमध्ये नुकतेच महामंडळाच्या वाटपाबाबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदाची लॉटरीही सातपुते यांना लागू शकते, त्यामुळे शिरसाट आणि फडणवीसांमध्ये सातपुते यांना मिळणाऱ्या कोणत्या पदाबाबत चर्चा झाली, याची उत्सुकता आहे.

ते म्हणाले, तुम्ही संयम ढळू दिला नाही, याचं कौतुक वाटतं. आमच्याकडं असं होत नाही. जाऊ नका रे म्हणून आमच्याकडे थांबवावे लागते. सकाळी अकराचा कार्यक्रम हेाता, आम्हाला यायला तीन वाजले आहेत. मतदारसंघाच्या विकासाची पॉझिटीव्ह लाईन ज्यांनी घेतली, त्यांना काही कमी पडत नाही. पण, मागण्या मागायाच्या वेगळ्या, काम करायचं वेगळं, असे चालत नाही. पण, सगळ्यांची माळशिरसचा विकास करायची आहे, अशीच मागणी हेाती.

Ram Satpute- Sanjay Shirsat
Sharad Pawar Politic's : जयंतराव जाऊन शशिकांत शिंदे आले; पण बळीराम साठेंना पवारांनी दिलेला शब्द पूर्ण होईना...

रामभाऊ, तुम्ही थोड्या मतांनी गेले. थोड्या मतांनी नाही तर माणूस एक मताने गेला तरी गेलाच. चिंता करू नका, पुन्हा तयारीला लागा. चांगलं काम करणारे कितीही वेळा निवडून येऊ शकतो, याबाबत आपल्यासमोर गणपतराव देशमुख यांचं उदाहरण आहे. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी लोक उभे असतात, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

Ram Satpute- Sanjay Shirsat
Mohol Politic's : उमेश पाटलांच्या नियुक्तीनंतर मोहोळमध्ये मोठी घडामोड; राजन पाटलांकडून फडणवीसांच्या ‘गुडबूक’मधील नेत्याला कार्यक्रमाचे निमंत्रण

राम सातपुते यांनी सांगितलेल्या कामासंदर्भात मी महसूल मंत्र्यांना बोलतो. माळशिरसच्या विकासाचा वेगळा आराखडा आपण तयार करू. राजकारण सोडून द्या. कोण आमदार आणि कोण खासदार आहे, हे बघू नका. काम करताना कार्यकर्त्यांना वाव मिळत असतो, असेही राम सातपुते यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com