Padma Shri award : जगप्रसिद्ध उद्योजक, भाजपच्या माजी मंत्र्याच्या भावाचा पद्म पुरस्काराने सन्मान : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या रत्नाचा गौरव

Padma Shri award Ashok Khade News : भारत सरकारचे २०२६ या वर्षाचे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून यात सांगली जिल्ह्यातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका उद्योजकाचे नाव आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात जल्लोष करण्यात येत आहे.
Padma Shri award Ashok Khade
Padma Shri award Ashok Khadesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ‘दास ऑफशोर’ कंपनीचे संस्थापक उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

  2. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पुरस्काराची घोषणा केली.

  3. पेड आणि मिरज येथे खाडे यांना मिळालेल्या सन्मानामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला.

Sangli News : शंकर भोसले

शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेणारे ‘दास ऑफशोर’ कंनपीचे संस्थापक, उद्योजक अशोक खाडे यांना आज मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येने केंद्र सरकारकडून त्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर खाडे यांची जन्मभूमी तासगाव तालुक्यातील पेडसह त्यांचे बंधू भाजपचे आमदार सुरेश खाडे यांची कर्मभूमी असलेल्या मिरेजत जल्लोष करण्यात आला.

भारत सरकारचे २०२६ या वर्षाचे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. उद्योजक अशोक खाडे यांना ‘व्यापार आणि उद्योग’ क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलेल्या अशोक खाडे यांच्या कष्ट, जिद्दीच्या प्रवासाचा हा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

‘दास ऑफशोर’ने इंजिनीअरिंग क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांच्या यशोगाथेला देशपातळीवर मान्यता मिळाली. खाडे हे 'दास ऑफशोर' या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीने इंजिनीअरिंगमध्ये देश-विदेशात नाव कमावले आहे. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या खाडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी कंपनीची स्थापना केली.

Padma Shri award Ashok Khade
Padma and Padma Shri awards : माजी मुख्यमंत्र्यांना मरणोत्तर 'पद्मभूषण'; अशोकमामासह महाराष्ट्रातील पाच जण 'पद्मश्री'!

ऑफशोर प्लॅटफॉर्म्स, सबसी इंजिनीअरिंग आणि मरीन कॉन्स्ट्रक्शनसारख्या क्षेत्रांत विशेषज्ञता प्राप्त केली. हजारोंना रोजगार दिला. स्थानिक पातळीवर तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली. खाडे यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवा आयाम मिळाला. स्थानिक उद्योगपती, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री. खाडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी हा आदर्श आहे, अशा भावना व्यक्त केल्या. पद्मश्री जाहीर होताच सांगलीतील उद्योग, व्यापारी संघटनेने त्यांचे अभिनंदन केले.

तीन भावांच्या नावातून तयार झाली DAS OFFSHORE :

अशोक यांनी स्थापन केलेली दास ऑफशोर ही कंपनी तीन भावंडांच्या नावातून तयार झाली आहे. दत्ता, अशोक आणि सुरेश (DAS) हे तिघे सख्खे भाऊ. मोठे दत्ता खाडे, दुसरे अशोक आणि तिसरे सुरेश खाडे. अशोक खाडे हे आज जगप्रसिद्ध उद्योजक आहेत. तर सुरेश खाडे आज भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार म्हणून ते काम करत आहेत.

Padma Shri award Ashok Khade
Padma Shri Awards 2025: महाराष्ट्रातील 'या' दिग्गजांना 'पद्मश्री'ने गौरविण्यात येणार

5 FAQs :

1) अशोक खाडे यांना कोणता पुरस्कार मिळाला?
👉 उद्योजक अशोक खाडे यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

2) अशोक खाडे कोण आहेत?
👉 ते ‘दास ऑफशोर’ कंपनीचे संस्थापक आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आहेत.

3) पद्मश्री पुरस्काराची घोषणा कधी झाली?
👉 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पुरस्कार जाहीर केला.

4) अशोक खाडे यांच्या सन्मानाचा उत्सव कुठे झाला?
👉 त्यांच्या जन्मभूमी पेड आणि मिरज येथे मोठा जल्लोष झाला.

5) सुरेश खाडे यांचा या बातमीशी काय संबंध आहे?
👉 सुरेश खाडे हे भाजपचे आमदार असून ते अशोक खाडे यांचे बंधू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com