Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंना 'कंसमामा' आणि 'रावणा'ची उपमा देत सख्या भाच्यानेच डागलं टीकास्त्र ; म्हणाले...

Maharashtra Politics : '' आमच्या मामाला काही कळत नाही..''
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pandharpur : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच ते विरोधी पक्षांवर विविध मुद्द्यांवरुन टीकेची झोडही उठवत आहे. याचदरम्यान, बावनकुळे यांना थेट 'कंसमामा' आणि 'रावणा'ची उपमा देत त्यांच्याच भाच्याने सडकून टीका केली आहे.

भारत राष्ट्र समितीचे नेते व चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाचे जयकुमार बेलाखडे यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बेलाखडे म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंसमामा आहेत, सध्या त्यांनी रावणाचं रुप घेतलं आहे. भाजप(BJP) च्या १०८ माळेच्या मण्यांमधील ते एक मणी आहेत. आमच्या मामाला काही कळत नाही अशी बोचरी टीका बेलाखडे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule News
BJP Vs ShivsenaUBT : ''... म्हणून 27 जुलै 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' घोषित करा!''; 'या' भाजप नेत्याची युनोकडे मागणी

यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारही टीकास्त्र डागले. ते म्हणाले, राज्यातील सरकार म्हणजे ५० खोकेवाल्या गारुड्यांचं सरकार आहे. हे सरकार जाऊन लवकरच शेतकऱ्यांचं बीआरएसचं सरकार सत्तेत येईल असंही बेलाखडे यावेळी म्हणाले.

जयकुमार बेलाखडे हे भारत राष्ट्र समितीचे (BRS)नेते आहेत. त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला असून त्यांनी आपल्या मतदारसंघातील ३ हजार नागरिकांसह पंढरपुरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मामा चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकेची झोड उठवली आहे.

राज्याच्या राजकारणात नवीन मामा भाच्यांची जोडी...

महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी शरद पवार- अजित पवार, बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, बाळासाहेब थोरात सत्यजीत तांबे, अनिल देशमुख - आशिष देशमुख अशा राज्याच्या राजकारणात काका पुतण्या, मामा भाचे अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यात आता आणखी एका नव्या जोडीची चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) आणि त्यांचे भाचे जयकुमार बेलाखडे हे होय. या जोडीतील बेलाखडे यांनी बावनकुळे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

Chandrashekhar Bawankule News
Gulabrao Patil News: मंत्री गुलाबराव पाटलांना दणका; न्यायालयाने ठोठावला 'एवढा' दंड

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे. बावनकुळे यांना भाजपानं २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पक्षानं त्यांना विधान परिषदेचे आमदार झाले आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपानं थेट त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.