Shambhuraj Desai : राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प... शंभूराज देसाई

Devendra Fadanvis राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला.
Shivsena Miniters Shambhuraj Desai
Shivsena Miniters Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी दिली.

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी आहे. महसूली तूट १६ हजार ११२ कोटी तर राजकोषीय तूट ९५ हजार पाचशे कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे

Shivsena Miniters Shambhuraj Desai
Shambhuraj Desai News: मंत्री देसाईंची कार्यकर्त्याप्रती तळमळ; रात्री आठ वाजता ताफा गावात पोहोचला...

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प राज्याला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर करेल.

Shivsena Miniters Shambhuraj Desai
Shambhuraj Desai News: तर जीभ हासडून टाकू...; कोकणातील सभेनंतर शंभूराज देसाईंचा ठाकरेंना थेट इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com